Swara On Gaza War : 'माझी मुलगी गाझामध्ये जन्माला आली असती तर...'! मुलीचा फोटो शेयर करत स्वराची मोठी प्रतिक्रिया

जगभरात सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईच्या युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. या युद्धानं अनेक मोठे प्रश्न निर्माण केले आहे.
Swara Bhaskar Bollywood Actress reaction on Gaza
Swara Bhaskar Bollywood Actress reaction on Gazaesakal
Updated on

Swara Bhaskar Bollywood Actress reaction on Gaza : जगभरात सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईच्या युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. या युद्धानं अनेक मोठे प्रश्न निर्माण केले आहे. सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल मधील परिस्थिती भलतीच भीषण आहे. जगभरातील विविध देशांनी इस्त्राईल आणि पॅलेस्टाई या दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

गाझा पट्टीमध्ये जे काही सुरु आहे ते खूपच निंदनीय असून त्या प्रश्नावर शांततेने विचार करण्याची गरज आहे. असे अनेक देशांनी उभय देशांना सुचवले आहे. मात्र त्याचा काहीही सकारात्मक परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. अशातच बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी देखील या युध्दाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. प्रख्यात अभिनेत्री स्वरा भास्करनं शेयर केलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

स्वरा ही नेहमीच तिच्या रोखठोक भूमिकेविषयी बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. क्षेत्र कोणतही असो त्यावर अधिकारवाणीनं बोलण्याची क्षमता स्वरानं दाखवून दिली आहे. यावेळी तिनं तिच्या मुलीचा फोटो शेयर करत गाझा पट्टीमध्ये जे युद्ध सुरु आहे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

स्वरानं त्या सगळ्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तिनं म्हटलं आहे की, माझ्या मुलीला अशाप्रकारच्या परिस्थितीचा कधीही सामना करण्याची वेळ येऊ नये. स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली असून त्यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. स्वराची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

Swara Bhaskar Bollywood Actress reaction on Gaza
Swara Bhaskar Baby: स्वराच्या घरी अनोखं सेलिब्रेशन, नातीच्या आगमनाने आजोबा झालेत भलतेच खुश

स्वरानं जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये ती आणि तिची मुलगी दिसत आहे.त्या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, कोणत्याही आईला थोडीच माहिती असते की, आपल्या मुलांच्या बाबत भविष्यात काय होणार आहे ते, मला वाटते जे सध्या होत आहे ते माझ्या मुलीच्या बाबत होता कामा नये. खूप भयानक परिस्थिती आहे. अशावेळी आपण परिस्थिताला मोठ्या धैर्यानं सामोरं जाण्याची गरज आहे. असेही स्वरानं म्हटले आहे.

Swara Bhaskar Bollywood Actress reaction on Gaza
Kangana Ranaut : कंगना आत्या झाली! भाच्याचं नाव काय ठेवलं माहितीये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.