Richa Chadha controversy : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या एका ट्विटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिचा चड्ढानं गलवान संदर्भात एक ट्वीट केलं होतं, ज्यामध्ये भारतीय लष्कराबाबत खिल्ली उडवणारं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून खूप वाद निर्माण झाला असून तिच्यावर चारीबाजूंनी टीका झाली होत आहे. असे असताना अभिनेत्री स्वरा भास्कर मात्र तिच्या बाजूने उभी राहिली, पण स्वराची ही भूमिकाही तिला चांगलीच महागात पडली आहे.
(Swara Bhaskar supports Richa Chadha amid Galwan tweet controversy, netizens trolled her )
रिचाच्या विधानावर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी टीका केलीच शिवाय राजकारणाच्या कॉरिडॉरपासून ते फिल्मी दुनियेपर्यंत सर्वच जण या विषयावर आपापली मते मांडत आहेत. या टीकेनंतर रिचानं ते वादग्रस्त ट्वीट डिलीट केलं तसंच याप्रकरणी तिनं भारतीय लष्काराची आणि सर्व सैनिकांची माफी मागितली आहे. माफीनाम्यात रिचानं सैनिकांचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचं सांगितलं. पण रिचाला हे ट्विट चांगलंच भोवल ,तिला सोशल मीडियावरही ट्रोल झाली आहे.
एकीकडे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तिला चांगलेच सुनावले आहे.तर काही कलाकार तिची बाजू घेत आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचा ही समावेश आहे. रिचा चढ्ढाच्या समर्थनार्थ ती मैदानात उतरली खरी पण आता नेटकऱ्यांनी स्वरालाच देशभक्तीचे धडे दिले आहे.
रिचा चड्ढाच्या गलवान प्रकरणावरील ट्विट लक्षात घेऊन स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये स्वरा भास्करने लिहिले आहे की- 'ऋचा चढ्ढा, तुला खूप सारी ताकद मिळो.. आणि तुझ्यासाठी भरपूर प्रेम...' म्हणजेच या ट्विटच्या माध्यमातून स्वरा भास्कर सध्या सुरू असलेल्या वादात ऋचा चढ्ढाचं उघड समर्थन करत आहे. स्वरा भास्करच्या या ट्विटनंतर ऋचा चढ्ढा यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाला आणखी जोर आला आहे.
स्वराच्या ट्विटवर कमेंट करत लोक तिला देशभक्ती शिकवत आहेत. स्वराला ट्रोल करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, "ती फुकटात फुटेज घेण्यासाठी आली आहे, कारण सध्या तिला कोणीही किंमत देत नाही", तर दूसरा म्हणतो, 'स्वरा तुला दुसऱ्याच्या फाटक्या पाय घालायची सवय आहे", तर एकाने म्हंटले आहे.. "स्वरा तु आधी तुझं बघ आणि मग हिला सपोर्ट कर" इतकेच नाही तर काही यूजर्सने तिला, ;स्वरा थर्ड क्लास आहेस तू' असे देखील म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.