'ब्रह्मास्त्र'ला बॉयकॉट करणाऱ्यांवर भडकलेल्या स्वराची जीभ घसरली;म्हणाली,'धंदा...'

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड बॉयकॉट नावाच्या वादळात चांगलंच सापडलं आहे. त्यावर आता स्वरा भास्करनं तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra
Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra Google
Updated on

Swara Bhaskar: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड बॉयकॉट (Bollywood Boycott) नावाच्या वादळात चांगलंच सापडलं आहे. एकीकडे बिग बजेट सिनेमे बॉक्सऑफिसवर एकापाठोपाठ फ्लॉप होताना दिसत आहेत तर सोशल मीडियावर बॉलीवूड बॉयकॉटच्या मागणीनं जोर धरला आहे. शमशेरा, लाल सिंग चड्ढा,रक्षाबंधन,दोबारा ते अगदी अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज पर्यं त सगळ्याच सिनेमांना बॉयकॉट केलं गेलं आणि त्या सिनेमातील स्टार्सनाही ट्रोल केलं गेलं. सध्या ट्वीटरवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमावर या ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मास्त्रला ट्रोल केलं जात आहे. यावर आता बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिखट प्रतिक्रिया आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिली आहे. चला जाणून घेऊया नेमकं स्वरा भास्कर काय म्हणाली आहे ते.(Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra)

Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra
सीट बेल्ट सक्तीवरनं पूजा भट्टची सरकारवर कडवी टीका; म्हणाली,'एवढंच गरजेचं तर आधी..'

ब्रह्मास्त्र विषयी रत्न नावाच्या एका नेटकऱ्यानं एक ट्वीट केलं. तो त्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ''ब्रह्मास्त्रवर पैसा वाया घालवू नका. यापेक्षा चांगल्या कामावर खर्ची करा. लक्षात ठेवा, हिंदू भावनांचा अपमान करणाऱ्या आणि 26/11 सारख्या दहशवादी हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्यांवर आपले पैसे वाया घालवू नका''.

Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra
'लाइगर'चा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ अडचणीत, सोडावं लागलं मुंबईतलं आलिशान घर

आता या ट्वीटवर स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे आणि अशा बॉयकॉट प्रकरणांना तिनं 'धंदा' म्हणून संबोधलं आहे. अर्थात आता स्वराच्या या ट्वीटनंतर तिलाच ट्रोल केलं गेलं. काहींनी स्वराचे काही बोल्ड सीन पोस्ट करत तिच्या कामाला 'धंदा' म्हणून हिणवलं तर काहींनी मात्र स्वराच्या ट्वीटला सहमती दर्शवली.

स्वरा भास्करने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं,''हा आता धंदा झालाय. 'बॉयकॉट बॉलीवूड' म्हणत कमाई करण्याचा सर्वात यशस्वी धंदा. सध्या स्वरा भास्कर तिच्या आगामी 'जहा चार यार' सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता,आणि तो पाहून प्रेक्षकांना कथेत दम आहे असं वाटलं होतं.

Swara Bhasker reaction over boycott trend over brahmastra
भर कार्यक्रमात एकता कपूरला कोसळलं रडू, म्हणाली,'लोक कसं सहन करतात की...'

'ब्रह्मास्त्र-पार्ट १ शिवा' ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनर अंतर्गत हा सिनेमा रिलीज केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र सिनेमाला बॉयकॉट करण्याचा ट्रेन्ड सुरू आहे आणि कारणं शोधून शोधून सिनेमाला ट्रोल करण्यासाठी जणू आर्मीच तयार केल्याचं दिसून येत आहे. रणबीर कपूरचं अनेक वर्षापूर्वींच 'बीफ' संदर्भातलं वादग्रस्त वक्तव्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल करत त्यालाच बॉयकॉट करण्या मागचं कारण म्हटलं गेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.