Swara Bhasker: स्वरा भास्करच्या लग्नाची तयारी झाली सुरू, व्हिडीओ व्हायरल

स्वराच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून यादरम्यान तिचा मित्र फराज अन्सारीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Swara Bhasker
Swara BhaskerSakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने अलीकडेच तिचा प्रियकर फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. तिने अचानक आपल्या लग्नाच्या या घोषणेने सर्वांनाच हैराण केले होते. आता लवकरच स्वराने पूर्ण विधी करून लग्नाची तयारी सुरू केली आहे.

स्वराच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून यादरम्यान तिचा मित्र फराज अन्सारीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. फराजने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्वरा भास्कर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Swara Bhasker
Aai Kuthe Kuthe Karte: सासूच करणार सुनेचं कन्यादान! अरुंधतीच्या लग्नाला अखेर कांचनमाला तयार..

आता त्यांच्या लग्नाबाबतच्या बातम्या समोर येत आहेत की त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून १२ मार्चपासून प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होतील. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा आणि फहादचा विवाहपूर्व सोहळा संस्कृतींचे एकत्रित मिश्रण असेल. याची सुरुवात मेहेंदी, सनडाउनर आणि भव्य संगीत सोहळ्याने होईल.

यानंतर दुसऱ्या दिवशी कर्नाटक संगीत होईल आणि त्याच दिवशी दोघे लग्न करतील . बुधवारी कव्वाली सोहळ्याचे नियोजन करण्यात आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. यानंतर, नवविवाहित जोडपे 16 मार्च रोजी दिल्लीत त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी रिसेप्शन आयोजित करेल.

एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, अभिनेत्रीने लग्नासाठी फक्त तिच्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले आहे. स्वराच्या लग्नात, तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि अभिनेत्री सोनम कपूर, दिव्या दत्ता आणि चित्रपट निर्माते फराज अन्सारी या सोहळ्यांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()