Bollywood News: तापसी पन्नु ही नेहमीच तिच्या रागीटपणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील तिला प्रेस कॉन्फरन्सवरुन ट्रोल व्हावं लागलं होतं. अनुराग कश्यप (Bollywood Director Anurag Kashyap) दिग्दर्शित दोबारा चित्रपट आपटल्यानंतर तापसीचा राग हा बाहेर आला आहे. तिनं एका पत्रकार परिषदेतून पत्रकारावर तिचं चिडणं हे त्याचं उदाहरण असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तापसीच्या व्हायरल (Viral Video) झालेल्या त्या व्हिडिओतून तिनं कशाप्रकारे पत्रकाराला झापले हे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोबारा फ्लॉप का झाला यावरुन तापसीला विचारणा केल्यानंतर तिनं तो राग व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी तापसीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये देखील थोडासा तिरकस प्रश्न विचारला असता तिला राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चिडलेल्या तापसीचा संयम सुटल्यानं परखडपणे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोबारा फ्लॉप झाल्यानं अनुराग सहित अनेकांना आपली निराशा लपवता आलेली नाही. अनुरागला दोबाराकडून मोठी अपेक्षा होती. मात्र त्याच्या त्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. अनुरागचा स्वताचा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे दोबाराला प्रेक्षकांनी नाकारणं महागात पडलं आहे.
प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी दोबाराला नाकारले याचे मुख्य कारण काय सांगता येईल असा प्रश्न तापसीला विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिलेलं नाही. प्रश्न टाळत दुसरा प्रश्न प्लीज असे म्हटल्यानं पुन्हा संबंधित पत्रकारानं पुन्हा एकदा तापसीला त्या प्रश्नाची आठवून करुन दिली आहे. पत्रकाराचा आवाज वाढल्याचे तापसीनं म्हटलं आहे यावर तापसीनं त्याला आवाज न वाढवता प्रश्न विचारण्याची विनंती केली. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
तुम्ही प्रश्न विचारा पण त्याला काही शिस्त हवी. असा सूर तापसीनं यावेळी आळवला आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तापसीचं कौतूक केलं आहे. तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे. तापसी गेल्या काही दिवसांपासून तू माध्यमांच्या व्यक्तींवर चिडताना दिसत असल्यानं तिला प्रश्न विचारुन हैराण करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.