‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) दिसणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. करीनाने सीतेची भूमिका साकारण्यासाठी सुरूवातीला आठ कोटी रुपये मानधन मागितले, त्यानंतर तिने ते वाढवून तब्बल 12 कोटी रुपये मानधन मागितल्याची चर्चा होती. त्यामुळे #BoycottKareenaKhan हा ट्रेंण्ड ट्विटरवर व्हायरल झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल करत चित्रपटाच्या निर्मात्यांना तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यास सांगितले. आता या विषयावर अभिनेत्री तापसी पन्नूने (taapsee pannu) आपले मत व्यक्त केले आहे. (taapsee pannu reacts to criticism of kareena kapoor for hiking her fee to play sita)
तापसी करीनाच्या या निर्णयाची पाठराखण करत म्हणाली, 'एखादा अभिनेता जेव्हा अधिक पैसे मागतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. म्हणे त्याचा दर्जा आता वाढला आहे. पण एखाद्या अभिनेत्रीनं मानधन वाढवलं तर तिच्यावर टीका करतात. हा लिंगभेद आहे. अभिनेत्री देखील तितकीच मेहनत करतात हे विसरता कामा नये. काही लोकांचा अहंकार दुखावला गेलाय त्यामुळं ते टीका करतायेत. करीनानं मानधन वाढवून योग्यच केलं.' ती पुढे म्हणाली, 'महिलांनी मानधनाची रक्कम वाढवल्यावर आपण असं नेहमीच ऐकत असतो. पण का नाही? ती आपल्या देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक आहे. जर तिने जास्त मानधनाची मागणी केली आहे तर तिचे ते काम आहे. तुम्हाला असे वाटते का की पौराणिक कथेतील भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात? मला तरी असे वाटत नाही.'
नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं आहे. जर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.