Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गेली काही दिवस कलाकारांच्या सोडून जाण्याने चर्चेत असलेली मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे निमित्त ठरले आहेत चंपकचाचा. काही दिवसांपूर्वी सेटवर चित्रीकरणा दरम्यान चंपक चाचा म्हणजेच अभिनेता अमित भट यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांना गंभीर दुखापत झाल्याचेही बोलले जात होते. पण ही सगळं खोटं आहे असं स्वतः चंपक चचा म्हणजे अमित भट यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. एवढेच नाही तर नेमकं काय घडलं तेही त्यांनी सांगितलं आहे.
(Taarak Mehta Fame Amit Bhatt Aka Champak Chacha not so Injured actor said dont trust on rumours)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वर्ग या शोचा चाहता आहे. मध्यंतरी या मालिकेतून अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली तरीही मालिकेचा टीआरपी कमी झालेला नाही. पण दोन दिवसांपूर्वी जेठाच्या वडिलांची भूमिका करणारे 'चंपक लाल चाचा' म्हणजेच अमित भट्ट यांना सेटवर गंभीर दुखापत झाल्याची वार्ता समोर आली. बघता बघता त्याविषयी अनेक अफवादेखील पसरू लागल्या. अखेर ही सगळं खोटं आहे ही सांगण्यासाठी चंपक चाचा म्हणजेच अमित भट यांनी एक व्हीडीओ शेयर केला आहे .
अमित भट्ट यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, 'नमस्कार मी अमित भट. कसे आहात तुम्ही सगळे.. मी आहे मजेत आणि तुमच्या समोर आहे. दोन दिवस सतत काही बातम्या समोर येत आहेत, ज्यामध्ये मला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. पण या बातम्या खोट्या आहेत. तसे काहीही झालेले नाही. मला खूप किरकोळ दुखापत झाली आहे.'
पुढे ते म्हणतात, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर एक सीन शूट केला जाणार होता, ज्यामध्ये सोढीच्या कारचा टायर हातातून सुटतो आणि तो त्याच्या मागे धावतो. शूटिंगदरम्यान रिक्षाला आदळल्यानंतर टायर मागे आला आणि 'चंपक चाचा' यांच्या म्हणजे माझ्या गुडघ्यावर आदळला, त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. डॉक्टरांनी थोडी विश्रांती सांगितली आहे. पं मी लवकरच सेटवर परत येईन.'असेही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.