Asit Modi : 'आता यावर जास्त भाष्य..', FIR दाखल झाल्यानंतर तारक मेहताच्या असित मोदींची प्रतिक्रिया चर्चेत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Modi
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Modi Esakal
Updated on

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Modi : लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली आणि नेहमी तिच्या वाढत्या TRP मुळे चर्चेत राहणारी टिव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सध्या अनेक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या शो चा वाद काही केल्या थांबत नसून तो आणखीच वाढत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Modi
Bigg Boss OTT 2: पहिलं नॉमिनेशन पडलं पार! घरात येताच 'या' चार सदस्यांवर टांगती तलवार..

शोमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांनी शोचे निर्माते असित मोदी आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप करत आहेत. तर एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप देखील केला त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

अभिनेत्रीने असित मोदी तसेच 'तारक मेहता'चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच मुंबई पोलिसांनी सांगितलं होते.

एफआयआर नोंदवल्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

या प्रकरणावर बोलतांना असित मोदी म्हणाले की, आम्ही सर्व आरोप फेटाळे आहेत. पोलिसांकडे आमचे म्हणणे मांडले आहे. Entertainment News in Marathi

जरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे ते यावर जास्त भाष्य करू शकत नसल्यास सांगत त्यांनी याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Modi
'Mehta Ka Ooltah Chashmah' मालिका अडचणीत; निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, लवकरच होणार अटक

15 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. नेहा मेहता, भव्य गांधी, शैलेश लोढा, गुरचरण सिंग, राज अनाडकट यांसारख्या मोठ्या कलाकारांनी या शो सोडला.

सर्वात लोकप्रिय दया ची भूमिका करणारी दिशा वकानीने देखील हा शो सोडला. शैलेश लोढा यांनीही शो सोडतांना निर्मात्यांवर आरोप केले होते.Entertainment News in Marathi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()