बबिताचा जोडीदार बघितला का? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Munmun Dutta
Munmun DuttaMunmun Dutta
Updated on

नवी दिल्ली : लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल सर्वांनाच माहिती आहे. लहान मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक सर्वच ही मालिका पाहत असतात. कित्येक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. जेठालाल, दयाबेन, भिडे, मेहता जितके प्रसिद्ध आहे तितकेच बबिता म्हणजे मुनमुन दत्ता प्रसिद्ध आहे. बबिता ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने आपल्या जोडीदाराची सर्वांसोबत ओळख करून दिली आहे.

बबिता ही हॉट दिसण्यासह आपल्या कपड्यांवरून चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती मालिकेतील लोकप्रिय कलाकार टप्पू म्हणजेच राज अनाडकटसोबत असलेल्या मैत्रीवरून चांगलीच चर्चेत आहे. यावरून काही मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मुनमुन दत्ताने उत्तरही दिले होते. यानंतर तिने सर्वांसमोर आपल्या जोडीदाराला आणले आहे.

Munmun Dutta
पाकिस्तानची विश्वचषकावर नजर? प्रशिक्षकपदी करणार या दिग्गजाची नियुक्ती!

बबिताने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या जोडीदारासोबत दिसत आहे. ‘हा ट्रेंड जोडीदारासोबत नेला’ असेही तिने लिहिले आहे. तिचा जोडीदार दुसरा कोणी नाही तर कार्टून कॅरेक्टर श्रेक आहे. सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे. ज्यामध्ये लोक श्रेकसोबत व्हिडिओ बनवून शेअर करतात दिसत आहे. तिनेही असे करून चाहत्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुनमुन दत्ता २००८ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’शी जुळली. तेव्हापासून ती या मालिकेत काम करीत आहे. बबिताच्या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. चाहते तिला बबिता म्हणूनच ओळखतात. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()