Taarak Mehta ka Ulta Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मात्र मालिकेला जणू ग्रहण लागल्यासारखं झालंय अन् १४ वर्ष मालिकेशी जोडला गेलेला एकेक कलाकार मालिकेला रामराम करताना दिसला.
सुरुवातीला अंजली ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री नेहा मेहतानं निर्मात्यांसोबतच्या मतभेदामुळे शो ला अलविदा म्हटलं. तर तारक मेहता ही टायटल भूमिका साकारत घराघरात पोहोचलेले शैलेश लोढांनी अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अन् सगळ्यांना धक्का बसला. मग इतरही प्रसिद्ध व्यक्तिरेखा बाहेर पडल्या.
आता हे सगळं कुठे स्थिरस्थावर होतंय तोवर आणखी एक नवा वाद मालिकेशी संबंधित समोर आला आहे.(Taarak Mehta Ka ultah chashmah controversy shailesh lodha salary remains unclear)
मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की मालिकेच्या निर्मात्यांनी शैलेश लोढा यांचे राहिलेले मानधन दिलेले नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राला शो संबंधित ही माहिती एका सूत्रानं दिली.
सूत्राच्या म्हणण्यानुसार, शैलेश लोढांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मालिकेत काम करणं थांबवलं होतं. पण अद्याप पर्यंत शैलेश लोढांचे राहिलेलं मानधन त्यांना देण्यात आलेलं नाही. बोललं जात आहे की हा थकीत मानधनाचा आकडा सहा अंकी आहे.
शैलेश गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मानधनाची वाट पाहत आहेत. पण निर्माता असित कुमार मोदी याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.
मालिकेशी संबंधित आणखी एका सूत्रानं सांगितलं आहे की,हे पहिल्यांदा घडत नाही जिथे निर्मात्यांनी कोणत्या कलाकाराला चेक द्यायला उशीर केला आहे.
आतापर्यंत अभिनेत्री नेहा मेहता ,जिनं मालिकेत अंजली ही व्यक्तिरेखा साकारली होती तिचे देखील ३०-४० लाख दिले गेलेले नाहीत. तर टप्पूची भूमिका करणाऱ्या राजा अनादकट यांना देखील या अडचणीचा सामना करावा लागला होता.
यासंबंधित खरं-खोटं करण्यासाठी जेव्हा शैलेश लोढा यांना संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी तक्रारीचा सूर काढत म्हटलं,''मला काहीतरी नवीन गोष्ट सांगा. मी आता प्रवासात आहे. जेव्हा मी परतेन तेव्हा मी नक्की याविषयावर बोलेन''. जेव्हा निर्माते असित मोदी यांना संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी यावर बोलणच टाळलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.