मुंबई : तबलिघी जमातीबाबत (tablighi jamaat) वादग्रस्त ट्विट (tweet issue) पोस्ट केल्याचा आरोप करणारी अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) विरोधातील फौजदारी फिर्याद (criminal complaint) अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Andheri court) आज फेटाळली. यामुळे कंगना आणि तिच्या बहिणीला दिलासा मिळाला आहे.
एड काशिफ अली खान देशमुख यांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात दंडाधिकारीं न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. मागील वर्षी एप्रिलमध्ये रंगोली चंडेँल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर तबलिघी जमातीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या पोस्टला कंगनाने समर्थन केले होते. मात्र या पोस्ट मुळे विविध धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि देशाच्या एकात्मिक भावनेला छेद पोहचत आहे असा आरोप देशमुख यांनी केला होता. तसेच विशिष्ट समाजातील लोकांचा अवमान आणि अशांतता निर्माण केली आहे असा दावा केला होता.
न्यायालयाने आंबोली पोलीस ठाण्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी याबाबत नुकताच तपास अहवाल सादर केला होता. यानुसार दंडाधिकारी भागवत झिरापे यांनी आज निकाल जाहीर केला. भादंवि कलम 153 अ, 153 ब, 295 अ आणि कलम 505 नुसार कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकारींंची परवानगी आवश्यक आहे, या समंती शिवाय खटल्याची कारवाई सुरू होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
न्यायालय याबाबत या परवानगी शिवाय कारवाई करु शकत नाही. या प्रकरणात अशी परवानगी तक्रारदाराने दाखल केली नाही, त्यामुळे या तक्रारीत तथ्य नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले. कलम 153 तेढ निर्माण करणे असून 153 ब राष्ट्रीय भावना भडकावणे, 295 अ म्हणजे जाणीवपूर्वक पोस्ट करणे आहे. कंगना आणि तिची बहीण जाणीवपूर्वक प्रक्षोभक ट्विट करून सामाजिक शांतता बिघडवतात असा आरोप देशमुख यांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.