बहुप्रतिक्षित 'दृश्यम २' मध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री? तब्बू म्हणाली...

'दृश्यम' सिनेमाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवत ब़ॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली होती.
Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'
Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'Google
Updated on

दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमा 'दृश्यम'च्या(Drishyam) हिंदी रिमेकनं बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करुन सुपरहिट सिनेमाचा मान मिळवल्यानंतर आता 'दृश्यम २' आपल्या भेटीस येत आहे. या सस्पेन्स थ्रीलर सिनेमाची उत्सुकता त्यामुळे सगळ्यांनाचा लागून राहिलेली आहे. आतापर्यंत काही मोजक्याच कलाकारांच्या अभिनयानं कथानक रंगलेलं आपण दृश्यमच्या पहिल्या भागात अनुभवलंच आहे. यात अजय(AJay Devgan) आणि तब्बू(Tabu) यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी आपण अनुभवलीच आहे. पण आता या सिनेमात आणखी एक बॉलीवूडचा मोठा अभिनेता आपल्याला दिसणार आहे बरं का. आता तो कोण आहे,त्याची नेमकी भूमिका सिनेमात काय असेल याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.(Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2')

Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'
ईशा गुप्ताचा वर्णद्वेषा संदर्भात मोठा खुलासा; म्हणाली,' मला इंजेक्शन...'

बोललं जात आहे की 'दृश्यम' सिनेमात आता अक्षय खन्नाची(Akshay Khanna) नव्यानं एन्ट्री होणार आहे. तब्बू सिनेमात तिची पोलिस ऑफिसरची मीरा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. अक्षय खन्नासोबत स्क्रीन शेअर करायला सध्या ती भलतीच उत्सुक आहे. अक्षयच्या सिनेमातील एन्ट्रीविषयी बोलताना,''तो खूप हुशार-उत्स्फुर्त अभिनेता आहे''. अशा शब्दात तब्बूनं अक्षयची प्रशंसा केली. ''अक्षय सेटवरचं वातावरण एन्जॉय करेल,आमची टीम त्याला आवडेल'', अशी आशा देखील तिनं व्यक्त केली.

Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'
सोनम कपूरला मुलगा होणार की मुलगी?; अनिल कपूर यांनी बोलता-बोलता सांगून टाकलं

पुढे अक्षयविषयी बोलताना तब्बू म्हणाली,'' मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करीत असले तरी माझी बहिण फराहनं त्याच्यासोबत आणि त्याचे वडील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत देखील काम केलं आहे''. तब्बून या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना म्हटलं आहे की,''अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांच्या खूप महत्त्वाच्या भूमिका 'दृश्यम २' मध्ये असणार आहेत''.

Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'
नयनताराला दक्षिणेत लेडी सुपरस्टार का म्हणतात?तिचे 'हे' 5 सिनेमे देतील उत्तर

दृश्यमच्या सिक्वेलमध्ये काम करण्याविषयी सांगताना तब्बूनं आपण प्रेक्षकांचं दृश्यम२ च्या माध्यमातून पुन्हा मनोरंजन करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं सांगितलं. सिनेमाचं कथानक माहिती असल्यामुळे ते मी आता अनुभवू शकते, आणि म्हणून ते माझ्या आयुष्याचाच एक भाग बनून गेल्याचं तब्बू म्हणाली.

Tabu is elated to have Akshaye Khanna on board for 'Drishyam 2'
मराठीतील विनोदाचे बादशहा 'भिरकीट' मध्ये एकत्र करणार कल्ला, Details Inside

तब्बूची स्वारी सध्या आपल्या प्रदर्शित झालेल्या 'भूलभूलैय्या २' सिनेमाला मिळालेल्या यशामुळेही खूप खूश आहे. या सिनेमात तिचा डबल रोल आहे. अर्थात सिनेमाच्या शेवटाला खलनायिका म्हणून तिचं समोर येणारं रुप पाहणाऱ्याला धक्का देतं एवढं निश्चित. कार्तिक आर्यनसोबतचे तिचे सीनही भन्नाट रंगलेयत. आता तिच्या अष्टपैलू अभिनयाचा नवा पैलू 'दृश्यम २' मध्ये अनुभवण्यास तिचे चाहतेही उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.