Tadap Review : अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा पुरेपूर मसाला

एखादा स्टार किड चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो, तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागलेलं असतं.
Tadap Review : अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा पुरेपूर मसाला
Tadap Review : अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा पुरेपूर मसालाsakal media
Updated on

एखादा स्टार किड चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो, तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागलेलं असतं. त्याचा लूक, त्याची बोलण्याची स्टाईल, चालण्याची ढब... एकंदरीत पडद्यावरचा त्याचा प्रेझेन्स आदी बाबी बारकाईने पाहिल्या जातात. आता सुनील शेट्टीचा मुलगा अहानने ‘तडप’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली आहे. अर्थातच ती धमाकेदार झाली आहे, असंच म्हणावं लागेल. अहानने पहिल्याच सिनेमात दमदार अभिनय केला आहेच. त्याची अॅक्शनही लाजबाब आहे. त्याला तारा सुतारियाची उत्तम साथ मिळाली आहे. अहान-ताराबरोबरच सौरभ शुक्ला आणि कुमुद मिश्रा अशा सगळ्याच कलाकारांनी चित्रपटाला चार चांद लावले आहेत. चित्रपटाची कथा अॅक्शन आणि रोमान्सने पुरेपूर भरलेली आहे.

Tadap Review : अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा पुरेपूर मसाला
अर्जुनसोबत मलायका पर्यटनाला गेली; दिसली डायनासोरची अंडी

इशाना (अहान शेट्टी) मसुरीत राहणारा तरुण. डॅडी (सौरभ शुक्ला) यांनी त्याला दत्तक घेतलेलं असतं. वडील आणि मुलामध्ये मैत्रीचं चांगलं नातं असतं. इशाना रमिसा (तारा सुतारिया) च्या प्रेमात पडतो. ती परदेशातून शिकून आलेली असते. तिचे वडील दामोदर (कुमुद मिश्रा) मसुरीतील मोठं राजकीय प्रस्थ. डॅडी आणि दामोदर चांगले मित्र असतात. दामोदर यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात डॅडीचा मोठा हात असतो. इशाना रमिसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. दोघेही लग्नाच्या आणाभाका घेत असतात. इशाना आपल्या वडिलांना अर्थात डॅडींना आपल्या प्रेमाबाबत सगळी माहिती देतो आणि त्यांनाच दामोदर यांच्याशी बोलणी करावीत, असे सांगतो; परंतु त्यानंतर कथानक काहीसं वेगळं स्वरूप घेतं. रमिसाच्या मनाचा अंदाज इशानाला येत नाही. केवळ टाईमपास म्हणून ती आपल्यावर प्रेम करीत असते, याची त्याला कल्पनाच नसते...

दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी ‘तडप’ चित्रपटात आगळीवेगळी प्रेमकथा बांधलेली आहे. सगळ्या कलाकारांची कामगिरी उतम झाली आहे. इशानाच्या व्यक्तिरेखेतील वेगवेगळे भाव पडद्यावर दर्शविण्यात अहान यशस्वी ठरला आहे. त्याच्या डोळ्यातील चमक-धमक पाहता त्याची भूमिका अधिक बोलकी झाली आहे. लव्हर बॉय, सच्चा आशिक ते रफ टफ इशाना अहानने उत्तम रंगवला आहे. चित्रपटसृष्टीत मोठा पल्ला गाठण्याची क्षमता त्याच्यात दिसते. तारा सुतारियाची भूमिका नकारात्मक आहे; परंतु तिचा रोमँटिक लूक चित्रपटात अधिक पाहायला मिळतो. कुमुद मिश्रा आणि सौरभ शुक्ला दोघेही जाणते कलाकार आहेत. त्यांनी भूमिकेला साजेसा अभिनय केला आहे. इशानाच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या सुमित गुलाटीने चांगलं काम केलंय. त्याच्या भूमिकेला दिग्दर्शकांनीही चांगला दिला आहे. प्रीतम यांचं संगीत सुमधुर आहे. विशेष बाब म्हणजे अरजित सिंगने गायलेलं ‘तुमसे भी ज्यादा...’ गाणं कथेला पुढे नेणारं आहे.

Tadap Review : अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा पुरेपूर मसाला
आयुषमानचा खुल्लमखुल्ला 'लिप लॉक'; नेटकरी म्हणे, 'तुमची बायको'...

मसुरीतील नयनरम्स लोकेशन्स डोळ्यांना सुखावणारी आहेत. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शकांचं त्यासाठी कौतुक करावं लागेल. चित्रपटाचं लेखन रजत अरोरा यांचं आहे. कथेची बांधणी उत्तम झाली असली, तरी पूर्वार्धात चित्रपट लवकर पुढे सरकत नाही. काहीसा रेंगाळलेला वाटतो; परंतु शेवट अन्य चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. अहानचा पहिलाच चित्रपट अॅक्शन आणि रोमान्सने पुरेपूर भरलेला आहे. लुथरिया यांनी बॉलीवूडला नवा अँग्री यंग मॅन दिला आहे, असंच म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()