Taj Divided by blodd web serise Naseeruddin : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा यांनी भलेही वादग्रस्त वक्तव्य करुन आपल्या नव्या मालिकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असेल मात्र ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास अपयशी ठरली आहे. बडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती.
इतिहासकार अजुनही अकबर बादशाह आणि त्याची राणी जोधाबाई यांच्यावर चर्चा करताना दिसतात. त्यातून हाती काही लागत नाही. सध्या ताज डिव्हायडेड बाय ब्लड या नव्या मालिकेत कुटूंब, कौटूंबिक संघर्ष, राजकारण, कपट, स्वार्थीपणा या साऱ्या गोष्टींना प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले आहे. अकबराची तीन मुलं, त्यांच्या राण्या, त्यांना असणारी सत्तेची हाव, त्यातून होणारा राजकीय संघर्ष हे दाखवताना दिग्दर्शकाला आपल्याला नेमकं काय सांगायचे आहे हेच कळेनासे झाले आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
Also Read - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
ऐतिहासिक विषयावर मालिका म्हणा किंवा चित्रपट तयार करणे हे कोणत्याही दिग्दर्शकापुढे मोठे आव्हान असते. अशावेळी त्या ऐतिहासिक कथेची, त्यातील व्यक्तिरेखांची मोडतोड तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. खासकरुन संवाद, व्यक्तिरेखांची भूमिका याकडे विशेष भर द्यावा लागतो. ताज मध्ये हे सारं आहे पण ते तितकं मनावर प्रभाव टाकत नाही. एक साधीशी मालिका आपण पाहत आहोत की काय असे वाटायला लागते. संवादावर आणखी भर द्यायला हवा होता. असे वाटू लागते.
ताज मध्ये सम्राट अकबराच्या पडतीचा काळ दाखवण्यात आला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात या राजाला किती संघर्षाला सामोरं जावं लागलं हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. पण त्यात पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. त्याच्याभोवतीच्या माणसांचे राजकारण, त्यांच्या सुप्त इच्छा हे सारं तो खुबीनं सांगतो पण त्यातून जो आशय प्रेक्षकांपर्यत पोहचायला हवा तो पोहचत नाही. याची हुरहूर जाणवत राहते. अकबराला आता आपला वारसदार निवडायचा आहे. त्याची तीन मुलं आहेत. त्यातून त्याला एकाची निवड करायची आहे.
अकबराला आपलं राज्य चालविण्यासाठी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असा राजा हवा आहे. पण त्याच्या एकाही मुलामध्ये ती गोष्ट त्याला आढळून येत नाही. त्यामुळे तो अस्वस्थ आहे. सगळ्यात मोठा मुलगा सलीम कायम दारुच्या नशेत त्याला दिसतो. तो धाडसी आहे, बंडखोरही आहे पण तरीही बादशहाचा त्याच्यावर विश्वास नाही. दुसरा मुलगा मुराद हा संतापी आहे. हिंसक आहे. तो मनात आल्यावर काहीही करु शकतो. त्याचा अनावर झालेला राग कसा शांत करायचा याची चिंता बादशहाला लागलेली असते.
अकबराचा लहान मुलगा दानियाल या पाचवेळा नमाज पठण करणारा धार्मिक वृत्तीचा मुलगा आहे. आता त्याच्या हातात तलवार द्यायची म्हणजे मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.असे अकबराला वाटते. सत्तेचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. अशावेळी बादशहा कायम संकटात सापडलेला दिसतो. अकबराला शेवटच्या दिवसात राजकारणाबरोबरच बाकीच्या गोष्टींनी देखील घेरले आहे. त्यात तो अडकून पडला आहे.
ताज डिव्हायडेड बाय ब्लडमध्ये शाही राजघराण्याचा ऱ्हास, त्यांच्यातील भांडणं हे दाखवण्यात दिग्दर्शकानं धन्यता मांडली आहे. बाकीच्या गोष्टींबाबत तो निश्चित उजवा आहे. ज्यात सिनेमॅटोग्राफी, प्रकाशयोजना, संकलन आणि पार्श्वसंगीत पण आणखी मेहनत जर संवादलेखन आणि व्यक्तिरेखेवर झाली असती तर सीरिज रंगतदार झाली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळेच की काय ज्या वेगानं ताजची सोशल मीडियावर चर्चा झाली त्याच वेगानं त्याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.
-----------------------------------------------------------
मालिकेचे नाव - ताज - डिव्हायडेड बाय ब्लड
दिग्दर्शकाचे नाव - रॉन स्कालपेलो
कलाकारांची नावं - नसिरुद्दीन शहा, असिम गुलाटी, धर्मेंद्र, सुबोध भावे, संध्या मृदुल, राहुल बोस
रेटिंग - **1/2
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.