Gautami Patil: मी हात जोडून विनंती करते.. गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर मंगला बनसोडे हळहळल्या..

तमाशा साम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी तीव्र निषेध करत गौतमीची बाजू मांडली आहे.
tamasha lavani mangala bansode rection on gautami patil viral video to support her
tamasha lavani mangala bansode rection on gautami patil viral video to support hersakal
Updated on

Mangala Bansode On Gautami Patil : सध्या एखाद्या सेलिब्रिटीला जेवढी प्रसिद्ध मिळत नाही तेवढी गौतमी पाटीलला मिळाली आहे. गौतमी हे नाव कुणाला माहीत नाही असं नाही. सुरवातीला आपल्या अश्लील हावभावानं नृत्य करते ओळखली गेलेली गौतमी नंतर चांगलीच चर्चेत राहिली.

तिच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला. अनेकांनी तिच्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली. पण गौतमीने मागी मागून आपले कार्यक्रम सुरू ठेवले. अगदी राजकीय विश्वापर्यंत गौतमी पोहोचली. सध्या ती लाखांमध्ये सुपारी घेत आहे. पण तीच प्रसिद्धी काही दिवसांपूर्वी गौतमीच्या मुळावर उठली..

tamasha lavani mangala bansode rection on gautami patil viral video to support her
Randhir kapoor: अखेर 35 वर्षांनी रणधीर कपूर आणि बाबिता एकत्र! घटस्फोटाविना राहिले होते विभक्त..

झाले असे की, गौतमी एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना कुणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने व्हायरल केला. हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी गौतमीमी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाने यात लक्ष घातले असून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. हे संदर्भात राज्यभरात अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. जे लोक आधी गौतमीच्या नाचावर टीका करत होते, तेही एक स्त्री म्हणून तिच्या बाजूने उभे राहिले आहेत.

अशातच महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी आणि तमाशा फडाच्या मालकीण मंगला बनसोडे-करवडीकर (Mangala Bansode) यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, "गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे. अशा महाराष्ट्रात एका स्त्रीची, महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?''

मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या की, "गौतमी पाटील एक स्त्री आहे आणि नंतर कलावंत आहे. त्यामुळे तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं चुकीचं आहे. गौतमी कलावंत असली आणि तिच्या हातून चुका झाल्या असल्या तरी तिने याबद्दल माफी मागितली आहे. परंतु आता स्त्रीजातीची विटंबना होत असल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. अशापद्धतीची विटंबना पुन्हा करु नये अशी मी हात जोडून विनंती करते. मी देखील एक कलावंत आहे, स्त्री आहे. त्यामुळे माझ्या विनंतीला मान द्या आणि तो व्हिडीओ व्हायरल करणं बंद करा", असे मंगला बनसोडे म्हणाल्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.