Tamasha Live Review: ब्रेकिंग न्यूजचा उत्कंठावर्धक 'तमाशा'

दिग्दर्शक संजय जाधवच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती.
Tamasha Live Review
Tamasha Live Reviewesakal
Updated on

Tamasha Live marathi movie: दिग्दर्शक संजय जाधवच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. चित्रपटाची गाणी आणि (Marathi Movie News) चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला होता आणि आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संजय जाधवचा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि निराळा असा प्रयत्न (marathi director sanjay jadhav) आहे. त्याने या चित्रपटाची कथा काव्यातून सुरेख उलगडली आहे. एकाच वेळी काव्य, नाट्य, नृत्य असा सगळा मामला एकत्र बांधण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची कथा सध्या विविध वृत्तवाहिन्यांचा टीआरपीसाठी चाललेला खटाटोप, त्यांच्यातील अटीतटीची स्पर्धा या भोवती फिरणारी असली तरी त्यांच्यातील या स्पर्धेवर जळजळीत अंजन घालणारी आहे.

एखाद्या बातमीचा वृत्तवाहिन्या करीत असलेला खेळ आणि त्याचा समाजावर किंवा संबंधितांवर होणारा परिणाम हेही सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. त्याचबरोबर खरी पत्रकारिता नेमकी काय आहे हेही दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा वरिष्ठ पत्रकार अश्विन (सचित पाटील) आणि नवोदित पत्रकार शेफाली (सोनाली कुलकर्णी) यांच्या भोवती फिरणारी आहे. आपण एका मोठ्या वृत्तवाहिनीमध्ये काम करीत असल्याचा अश्विनला सार्थ अभिमान असतो. त्याच्या कार्यक्रमाला चांगलाच टीआरपी मिळत असतो तर शेफाली ही नवखी आणि नवोदित पत्रकार असते. साहजिकच सीनियर पत्रकारालाबद्दल तिला आपुलकी आणि आदर असतो. एका कार्यक्रमात तिची आणि अश्विनची भेट होते.

अश्विनसारख्या पत्रकाराला ती आदर्शस्थानी मानत असल्यामुळे त्याच्याबरोबर काम करावे अशी तिची मनीषा असते. आपली ही मनीषा ती अश्विनला बोलून दाखविते. परंतु अश्विन तिला ती छोट्या वृत्तवाहिनीत काम करीत असल्यामुळे चांगलेच खडे बोल सुनावतो. अपमानीत झालेली शेफाली त्यानंतर ईर्ष्यने उतरते. एका उंच इमारतीतून उडी मारलेल्या भक्ती नावाच्या तरुणीची आत्यहत्या की हत्या यावरून शेफाली आणि अश्विन यांच्यामध्ये चांगलीच जुंपते. दोघेही आपापल्या परीने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. भक्तीच्या मृत्यूवरून राजकारणही पेटते. त्यानंतरहा तमाशाचा फड चांगलाच रंगतो आणि वेगळे वळण घेतो. दिग्दर्शक संजय जाधव आणि टीमचा हा चित्रपट म्हणजे एक वेगळा प्रयोग आहे.

सध्या वृत्तवाहिन्यांचा टीआरपीसाठी चाललेला खेळ, त्यांच्यातील तीव्र स्पर्धा ही कथा दर्शविताना त्याला काव्याची छान जोड देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीच्या खेळात एखाद्या कुटुंबाची कशी ससेहोलपट होते किंवा त्या कुटुंबाला कोणते दुःख सहन करावे लागते हेही सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेता सचित पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, योगेश सोमण, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, पुष्कर जोग या कलाकारांच्या सार्थ अभिनयाची छान जोड या कथानकाला लाभलेली आहे. अश्विनच्या भूमिकेतील विविध भाव सचित पाटीलने पडद्यावर छान रेखाटले आहेत तर शेफालीच्या भूमिकेचे बेअरिंग सोनालीने छान पकडले आहे.

सुरुवातीला सरळ व साध्या असणाऱ्या शेफालीमध्ये नंतर कसा बदल होतो....ती कशी धाडसी बनते...या भूमिकेतील विविध बारकावे सोनालीने छान टिपलेले आहेत. विशेष म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी यांच्या बहुरंगी आणि बहुढंगी भूमिका लक्षात राहणाऱ्या अशाच आहेत. त्यांनी आपापल्या भूमिकेत चांगले गहिरे रंग भरलेले आहेत. त्यांच्या विविध वेशभूषा-केशभूषा, त्यांची बोलण्याची आणि चालण्याची ढब वैशिष्टय़पू्र्ण आहेत. योगेश सोमणने नीतिमूल्य जपणाऱ्या पत्रकाराची भूमिका उत्तम साकारली आहे.

Tamasha Live Review
IMDb Top Movies: काश्मीर फाईल्स बाहेर, KGF 6 व्या स्थानी, टॉपला कोण?

चित्रपटाचे गीतलेखन, संगीत आणि कोरिओग्राफी छान झाली आहे. त्याबाबत गीतकार क्षितीज पटवर्धन, संगीतकार अमित राज, पंकज पडघन यांच्याबरोबरच कोरिओग्राफर उमेश जाधव यांचे कौतुक निश्चित करावे लागेल. कारण या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत आणि त्या गाण्यांना उत्तम संगीताबरोबरच कोरिओग्राफीची छान साथ लाभलेली आहे. तरीही चित्रपटात काही त्रुटी आहेत. मध्यांतरानंतर चित्रपटाची कथा वेगाने पुढे सरकते आणि उत्कंठा वाढविते. एकूणच कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला तसेच संगीत आणि नृत्याचा वेगळा साज असलेला असा हा वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे.

चित्रपटाचे नाव - तमाशा लाईव्ह

दिग्दर्शक - संजय जाधव

कलाकार - सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, नागेश भोसले, योगेश सोमण

रेटिंग - ***1/2

Tamasha Live Review
Movie Review: भावनिक नातेसंबंधांवर भाष्य करणारा 'जुग जुग जिओ'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.