Kailash Waghmare: इथे अभिनयापेक्षा दिसणं, जात.. अभिनेता कैलास वाघमारेनं सांगितलं सिनेसृष्टीचं भयानक वास्तव

कैलास म्हणतो, सिनेसृष्टीत एखाद्याच्या दिसण्यावरुन ठरवलं जातं की त्याच्याशी कसं वागायचं..
tanhaji movie fame actor kailash waghmare shared  worst experience about your face beauty and cast in movie industry
tanhaji movie fame actor kailash waghmare shared worst experience about your face beauty and cast in movie industry sakal
Updated on

Kailash Waghmare: कैलास वाघमारे हे नाव आता मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे.

कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याबरोबरच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलासला वेगळी ओळख मिळवून दिली.

त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. त्याने त्याच्या कामाने सर्वांना अवाक करून दखल घ्यायला भाग पडले आहे. लवकरच त्याचा आगामी ‘गाभ’ हा मराठी चित्रपट येणार आहे.

याच निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने मनोरंजन विश्वाचं भयानक वास्तव मांडलं आहे. कामपेक्षा तुमच्या जातीला, दिसण्याला किती महत्व दिलं जातं यावर त्याने सडेतोड भाष्य केलं आहे.

(tanhaji movie fame actor kailash waghmare shared worst experience about your face beauty and cast in movie industry )

tanhaji movie fame actor kailash waghmare shared  worst experience about your face beauty and cast in movie industry
Vanita Kharat: वनिता खरातला पाहण्यासाठी लोकांची गर्दी! थेट चाळीत जाऊन साजरी केली पहिली होळी..

या मुलाखतीत तो म्हणाला, 'सिनेसृष्टीत अनेकदा एखाद्याच्या दिसण्यावरुन किंवा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कसं वागायचं हे ठरवलं जातं. ही गोष्ट कायमच मनाला चटका लावून जाते. त्यावेळी आपला अभिनय लोकांना दिसत नाही का?' अशी खंत त्याने व्यक्त केली. '

''एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात काम देताना काही लोक तु्म्हाला विविध नजरेतून पाहतात. मी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची भाषा समोरच्या व्यक्तीला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा त्याचं काय करायचं?''

''मला तर पाहिल्याबरोबरच माझी एखाद्या श्रेणीत विभागणी केली जाते. हा कोणत्या तरी एका विशिष्ट जात, समूहाचा असणार किंवा हा गावाकडचा असणार आहे. याचाच अर्थ याला काहीच येत नसणारं. त्यानंतर मात्र तुम्हाला ट्रीट करणं सुरु होतं,'' असा भयानक अनुभव कैलासने सांगितला.

पुढे तो म्हणाला, ''मला तर अनेकदा माझ्या दिसण्यावरुन बोललं गेलं. मी काही बोलण्यापूर्वी माझ्याबद्दल मतं बनवली गेली. पण याच परिस्थितीने मला तितक्याच हिमतीने तोंड द्यायला शिकवलं. आता माझा अभिनय पाहिला की सर्वजण शांत होतात,' असे तो म्हणाला.


कैलासने आजवर भिरकीट, हाफ तिकीट, भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, सायकल, मयत, भाऊ, हिरवी अशा चित्रपटातून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'तानाजी' या चित्रपटातून त्याने बॉलीवुडलाही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()