Mee Too: 'मी आत्महत्या करणार नाही पण...' तनुश्री दत्ताची मदतीसाठी हाक

बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ही तिच्या सिनेमांमुळे जितकी चर्चेत आली नसेल तितकी Mee too प्रकरणामुळे आली. आता पुन्हा तिची पोस्ट चर्चेत आली आहे.
Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted
Tanushree Dutta cries for help after being harassed & targetedInstagram
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता(Tanushree Dutta) ही तिच्या सिनेमांमुळे जितकी चर्चेत आली नसेल तितकी Mee too प्रकरणामुळे आली. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानं थेट अभिनेते नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिनं बॉलीवूडमध्ये मीटू ची मोहिमच छेडण्यास मोठं कारण दिलं होतं. रातोरात तनुश्री दत्ता हे नाव जगाच्या कोपऱ्यात पोहोचलं होतं तेव्हा. आता पुन्हा त्याच तनुश्री दत्तानं एक लांबलचक पोस्ट लिहित बरंच काही त्यात म्हटलं आहे. ज्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 'मला छळलं,मला टार्गेट केलं' असं म्हणत तिनं आपल्यावर झालेल्या अन्यायाची,छळवादाची उदाहरण देत पोस्टमध्ये म्हटलं आहे,''मी आत्महत्या करणार नाही,मी लढणार''. चला जाणून घेऊया पुन्हा तनुश्री दत्तानं हा वाद छेडण्याागे नेमकं कारण काय आहे.(Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted)

Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted
लंडनच्या मंडईत प्रवीण तरडेंना भेटला मराठी भाजीविक्रेता, Video मधून केलं आवाहन

तनुश्री दत्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावूक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. बॉलीवूडमध्ये काम करताना तिला ज्या दिव्यातून जावं लागलं आहे त्याचा पाढाच तिनं वाचला आहे. आणि म्हटलंय की,'मी आत्महत्या करणार नाही, मी शेवटपर्यंत लढणार.'इतकंच नाही तर तिनं आपल्या मेडवरही तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

ती म्हणाली आहे,''मला खूप त्रास दिला,वाईट पद्धतीनं मला जाणून-बुजून लक्ष्य केलं,केलं जातंय. प्लीज,कुणीतरी काहीतरी करा माझ्यासाठी. पहिल्यांदा माझ्यासोबत वाईट घडलं ते बॉलीवूडमध्ये, नंतर माझ्याच घरात काम करणाऱ्या मेडने मला मारण्याचा प्रयत्न केला,नंतर उज्जैनला जाताना माझ्या गाडीचा अपघात. थोडक्यात मी सगळ्यातून बचावले,मुंबईला ४० दिवसांनी परतले आणि माझं नॉर्मल लाइफ जगत होते, तर कुणी दृष्टानं पुन्हा कुरघोडी करत माझ्या घराच्या बाहेर किळसवाणी गोष्ट ठेऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न केला''.

Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted
Sushmita Sen: 'Ex' विक्रम भट्टनं तोडली चुप्पी, म्हणाले,'तिची भूक तर...'

तनुश्रीला आपल्या या पोस्टमधून एवढंच म्हणायचं आहे की माझ्यासोबत एवढे सगळे वाईट प्रकार घडले,मला बाहेर पडणं देखील लोकांनी मुश्किल केलं तरी मी आत्महत्या करणार नाही,सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. ना मी इथून कुठे जाणार ,ना माझा लढा थांबवणार. मी इथेच राहणार आणि माझं करिअर आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. बॉलीवूड माफिया,महाराष्ट्रातला जुना एक राजकीय गट ज्याची अजूनही दहशत आहे आणि काही गु्न्हेगारी घटक या सगळ्यांचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. मला पक्की खात्री आहे की मी टू ची मोहीम छेडली तेव्हा जे माझ्या समर्थनार्थ समोर आले ते माझ्या पाठिशी आहेत. Mee too चे गुन्हेगार आणि NGO ज्यांचा मी पर्दाफाश केला आहे तेच मला टार्गेट करण्यात,छळण्याच्या मागे आहेत. मी अनेकदा इन्स्टावर पोस्ट करुन आवाज उठवत असते. त्यामुळे कोणत्या न कोणत्या माध्यमातून माझा मानसिक,शारिरीक छळ करण्याचा प्रयत्न केला जातो. असं कसलं हे सोशल मीडिया जिथे तरुण मुला,मुलींनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली की त्यांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला जातो,किंबहुना मारलंही जातं''.

Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted
R Madhavan's Rocketry: सिनेमा पाहून खेर रडले, भारतीयांनी माफी मागा म्हणाले

''मला आशा आहे की आपल्या राज्यात महाराष्ट्रात कायदे कडक होतील,.आणि छोट्यातल्या-छोट्या घटनांची दखल घेतली जाईल,त्यावर अॅक्शन घेतली जाईल. सगळंच हाताबाहेर चाललं आहे. माझ्यासारखे सर्वसामान्य भरडले जात आहेत. काहीतरी मोठं इथे घडलं पाहिजे,बदल गरजेचा आहे. आज जिथे मी आहे उद्या तिथे तुमच्यापैकी कुणीही असू शकतं. मला माहितीय मी इन्स्टावर पोस्ट करते,माझं म्हणणं मांडते ते अनेकांना थोतांड वाटत असेल,पब्लिसिटी वाटत असेल,याचा चुकीचा अर्थ काढला जात असेल. पण मला टार्गेट केलं जातंय,माझ्या बद्दल मुद्दामहून अफवा पसरवल्या जात आहेत,ज्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही अशा गोष्टींशी मला जोडलं जात आहे''.

Tanushree Dutta cries for help after being harassed & targeted
'भारतीय पुरुषांनी मला नेहमीच...'; काय बोलून बसली मल्लिका शेरावत

''आता मला माझ्या अध्यात्मातील साधनेनं ताकद दिली आहे. मला माझ्या आयुष्यातील नवीन संधी यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे, हे कृष्णा,माझ्या पाठीशी रहा ''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.