Tarak Mehta Fame Dilip Joshi : तारक मेहताच्या जेठालालनं दीड महिन्यात घटवलं १६ किलो वजन! काय केलं?

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये जेठालालची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार दिलीप जोशी यांची लोकप्रियता मोठी आहे.
dilip joshi
dilip joshi
Updated on

Dilip Joshi reduced 16 kg weight in one and a half month :टीव्ही मनोरंजन क्षेत्रात गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ज्या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले त्यांचे निखळ मनोरंजन केले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची लोकप्रियता अजुनही कायम आहे. या मालिकेनं प्रेक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून हसवलं आहे. त्या मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षक यांचे वेगळे नातेही तयार झाल्याचे दिसून आले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये जेठालालची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार दिलीप जोशी यांची लोकप्रियता मोठी आहे. आपल्या अभिनयानं त्यांनी चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्या मालिकेमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण करुन जोशी हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता त्यांच्याविषयीची एक बातमी समोर आली आहे. अवघ्या दीड महिन्यात जेठालाल यांनी १६ किलो वजन कमी केलं होतं. त्यांची ती मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दिलीप यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आगामी एका चित्रपटासाठी १६ किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. मॅशेबल इंडियामध्ये बोलताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. दिलीप यांनी सांगितलं की, १९९२ मध्ये हु हुंशी हुंशीलालची भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करण्याचे आवाहन स्विकारावे लागले होते. मी ज्याठिकाणी काम करत होतो तिथून घरी पायी जायचो. याशिवाय मी स्विमिंगही करत होतो. याचा फायदा मला झाला.

dilip joshi
Delhi Metro : कपलचे अश्लील चाळे, तर रिल्ससाठी प्रवाशांना त्रास, VIRAL VIDEO नंतर मेट्रोत पोलीस घालणार गस्त

भर पावसातही मी जॉगिंग करत जायचो. पण यासगळ्याचा मला खूपच फायदा झाला. रोजची ४५ मिनिटं कसरत मला खूपच फायद्याची ठरली. त्यामुळेच की काय अवघ्या दीड महिन्यात मी १६ किलो वजन कमी केलं होतं. हुंशी हुंशीलाल एक गुजराती चित्रपट होता, राजकारणावर व्यंगात्मक भाष्य करणाऱ्या त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये रेणूका शहाणे,मनोज जोशी, मोहन गोखले यांच्या भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.