Tarala Movie Review - मुली तू पहिल्यांदा लग्न कर नंतर मग तुला काय आणि कशात करिअर करायचे ते कर...असं अजूनही समाजात मुलींना सांगितले जाते. त्यांना जर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी अनेकांना आपल्या मनातील गोष्ट समजावून पटवून द्यावी लागते. इतक्या सहजीसहजी ते दुसऱ्यांना काही पटत नाही. मात्र तुम्ही जेव्हा हुमाचा तरला नावाचा चित्रपट पाहता तेव्हा तुम्ही तिनं जे काही केलं त्याला सलाम केल्याशिवाय राहत नाही.
गेल्या काही दिवसांपासून हुमाच्या या नव्या चित्रपटाची चर्चा रंगली होती. अखेर तो तरला नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. झी ५ या ओटीटीवर आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या महाराणी नावाच्या मालिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतूक केले होते. त्यात तिनं खेडूत महिला ते महिला मुख्यमंत्री अशी जी व्यक्तिरेखा रंगवली आहे त्याचे अनेकांनी कौतूक केले आहे. चाहत्यांनाही तिची ती भूमिका भावली.
Also Read -manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या
यानंतर हुमाच्या तरलचा ट्रेलर व्हायरल झाला. त्यात तिनं जीव तोडून केलेली मेहनत आता रंगताना दिसते आहे. त्याचं चाहत्यांनी कौतूकही केले आहे. त्या चित्रपटामध्ये तरलाच्या पतीचा बॉस त्याला म्हणतो की, असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे योगदान असते. मात्र महिलांना यशस्वी व्हायचे असते तेव्हा त्यांच्या मदतीला पुरुषांचे खांदे येत नाहीत. हे एक जळजळीत वास्तव आहे. असे तो सांगतो तेव्हा तरलाच्या पतीच्या डोळ्यातील पाणी खूप काही सांगून जाते.
तरला हा जेवढा हसवतो तितकाच तो विचार कऱण्यास भागही पाडतो. एका आगळ्या विषयाची मांडणी दिग्दर्शकानं या चित्रपटाच्या माध्यमातून केली असून त्याला त्यानं न्यायही दिला आहे. आपल्या समाजामध्ये पुरुषांचा धाक, वर्चस्व हे काही नवीन नाही. त्यामुळे मळलेल्या वाटा सोडून नवीन काही करु पाहणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक असणाऱ्या तरलासारख्या काही महिलांचे वेगळेपण हा चित्रपट मांडतो. हा चित्रपट आवर्जून प्रत्येकांनं पाहावा असा आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.
तरलाला तरुणपणी काही गोष्टींनी भुरळ घातली आहे. आपण खूप काही करु शकतो. पण नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न तरलाला पडतो. ती लग्नाच्यावेळेस देखील पतीकडून वचन घेते जेव्हा मला नव्यानं कोणत्या उद्योगात जायचे असेल तेव्हा मला तुमच्याकडून सहकार्य हवे. पतीही त्याला तयार होतो. त्याच्या सहकार्याशिवाय तरलाची लांब उडी कशी काय शक्य होणार. तरला सुरुवातीपासून स्वयंपाकाची आवड. तिच आवड तिला कुठल्या कुठे घेऊन जाते हे सांगणारा हा चित्रपट आहे.
ज्यांना तरलाचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हा चित्रपट जरुर पाहावा असा आहे. त्यात हुमाचा अभिनय प्रभावी आहे. तिनं साकारलेली तरला हा कमालीची उत्साही आणि प्रेरणादायी आहे. काहीही झालं तरी जिद्द हारायची नाही. असा तरलाचा स्वभाव आहे. ही एका रियल स्टोरीवरील आधारित फिल्म असून तरलाला तिच्या प्रेरणादायी प्रवासासाठी पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले.
चित्रपटाचे नाव - तरला
दिग्दर्शक - पियुष गुप्ता
कलाकार - हुमा कुरैशी, शारिब हाश्मी, भारती आचरेकर, भावना सोमय्या
वेळ २ तास ७ मिनिटे
रेटिंग- *** (तीन स्टार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.