TDM Cinema : 'टीडीएम' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अण्णा हजारे आले धावून; म्हणाले, आम्ही...

TDM Cinema
TDM Cinema
Updated on

- रावसाहेब चक्रे

देवदैठण : अहमदनगर जिल्ह्यातील निर्माता दिगदर्शक भाऊराव कऱ्हाडे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ख्वाडा यांच्या टीडीएम मराठी सिनेमाला शहरी भागात थिएटर मिळत नसल्याची व सिनेरसिकांच्या सोयीच्या वेळी सिनेमा लावला जात नसल्याची कैफियत या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले.

TDM Cinema
Bribe : वाळूवाल्यांकडून हप्त घेताना अटक; आता तहसीलदारासह हस्तकाची पोलीस कोठडीत रवानगी

त्यावर सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील चित्रपटाला जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असतील तर या चित्रपटाच्या पाठिशी आपण उभे राहू, असा ठाम विश्वास अण्णांनी टीम टीडीएमला दिला. लोकशाहीत अशी गळचेपी सहन केली जाणार नाही, असा इशाराही अण्णांनी दिला.

टीडीएम चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी या चित्रपटातील कलावंत बंडा कऱ्हे, सतिश डोंगरे व बाबूराव पाचंगे यांच्यासमवेत अण्णा हजारे यांची नुकतीच राळेगण सिद्धी (ता.पारनेर) येथे भेट घेतली. ग्रामीण भागातील प्राप्त प्रतिकूल परिस्थिती व समाजातील दुष्प्रवृतींशी लढणाऱ्या नायकाची कथा टीडीएम मधून मांडली आहे. सिनेरसिकांनी हा चित्रपट उचलून धरला होता.

तथापि, व्यावसायिक स्पर्धेतून पुणे, मुंबई व इतर शहरातील चित्रपटगृहांनी चौथ्याच दिवशी हा सिनेमा काढून टाकला.याबाबत विचारणा केली असता वरून दबाव असल्याचे सांगितले गेल्याचे कऱ्हाडे यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ही लोकशाहीची गळचेपी आहे.

लोकशाही संघराज्यात लोकांना जे आवडेल, जे हवे आहे ते दाखविले गेले पाहिजे. लोकांची मागणी असेल तर अशा प्रकारे सिनेमा काढणे गैर काय आहे. हा सिनेमा व त्यातील ग्रामीण भागाच्या व्यथा, नायकाचा संघर्ष लोकांना आपल्या जीवनाशी निगडीत व जिव्हाळ्याचा वाटत असेल तर तो बघू दिला पाहिजे, त्यासाठी सिनेमागृह उपलब्ध करून दिली पाहिजेत,अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. आपण या विषयात भाऊराव कऱ्हाडे व टीडीएम टीम च्या पाठिशी उभे राहू, असे ते म्हणाले.

TDM Cinema
Raj Thackeray: 'तुम्ही मला मतदान करत नाही'...अन् राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले

टीडीएमची नियोजनबद्ध कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे समजल्यानेच राज्यात विविध ठिकाणी चालू असलेले चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला. कर्ज काढून हा सिनेमा काढला आहे. अनेक नवकलावंतांचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील समस्या,अडचणी यापूर्वीही चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्या असून,ग्रामीण भागातील चित्र प्रभावीपणे मांडलेल्या ख्वाडा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

टीडीएम चित्रपटगृहाचे प्रक्षेपण थांबविण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या विविध भागातून पाठिंब्याच्या प्रतिक्रिया आल्या. शिरूरकर रसिकांनी चित्रपटाची समस्या वेशीवर टांगण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर टीडीएम पुन्हा त्याच जोशात प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाचे निर्माते - दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला असून, हा चित्रपट पुन्हा कधी सुरू होतोय, अशी विचारणा सर्वच स्तरांतील प्रेक्षकांकडून येऊ लागल्याने येत्या ९ जून रोजी राज्यभर हा चित्रपट पूनर्प्रदर्शित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"ग्रामीण भागातील मुले काही वेगळे करू पाहात असतील,चित्रपटासारख्या संवेदनशील विषयाच्या माध्यमातून समाजाला काही संदेश देऊ पाहात असतील,दैनंदीन अडचणी व जीवनातील समस्यांवर मात करायला शिकवत असतील तर आपण या प्रयत्नांच्या पाठिशी उभे राहू.समाजभान म्हणून सर्वसामान्य जनतेनेही त्यांना पाठबळ द्यावे.लोकशाहीत लोकांना एखादा विषय हवासा असेल आणि तो समाजहिताचा असेल तर त्यामागे उभे राहाणे सर्वांचेच कर्तव्य आहे.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.