ख्वाडा, बबन आणि आता टीडीएम सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील खुप प्रसिद्ध चेहरा आहे. नुकताच त्यांचा टीडीएम हा वेगळ्या थाटणीच्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला.
टीडीएमचा ट्रेलर येताच व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचं वेध लागलं होतं. २८ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचं दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊनं बोलून दाखवली आहे.
त्यानंतर फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून भाऊनं प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यानं येत्या काळात आपण टीडीएचे शो मागे घेत असल्याचं सांगतिलं आणि त्यानंतर काही काळानंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
मात्र या चित्रपटाला मिळालेल्या वागणुकीनंतर मराठी मनोरंजन विश्वात वेगवेगळे गट तयार झाले. टिडिएमला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांनी टिडिएम या चित्रपटाला पाठिंबा देत रस्त्यावर उतरले होते.
तर दुसरीकडे या चित्रपटाचं प्रमोशन आणि मार्केटिंग योग्यरित्या झालं नसल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. निर्मात्यांनी मराठी चित्रपटांची यादी, प्रदर्शनापुर्वी योग्य तारिख वैगरे सगळ्या गोष्टींची माहीती करुन चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता असा सल्लाही त्यांना देण्यात आला होता.
अशा परिस्थिती निर्मात्यांचं नेमक म्हणणं काय आहे. त्यांच्या भावना,मराठी मनोरंजन विश्व, त्यातील काही ठराविक लोकांच्या वेगळ्या मानसिकतेविषयी सकाळच्या Unplugged पॉडकास्टने भाऊराव कऱ्हाडे यांची विषेश मुलाखत घेतली या मुलाखतीतच त्यांनी या अनेक मूद्यावर सविस्तरपणे चर्चा केली.
त्यामुलाखतीत टीडीएमचे प्रमोशन झाले नाही त्याचाच फटका चित्रपटाला बसला असं म्हणणाऱ्यांना भाऊराव यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं. याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, 'माझ्या यापूर्वीच्या कोणत्याही चित्रपटाच्या बाबत असे घडले नव्हतं. जे कुणी म्हणतात माझ्या चित्रपटाचे प्रमोशन झाले नव्हते त्यांना मला सांगायचं आहे की, टीडीएमचे जोरदार प्रमोशन झाले होते. प्रमोशन झाले नसते तर जी ४० टक्के लोकं थिएटरमध्ये आलीत ती आली नसती.
लोकं जे म्हणतात की, माझ्या चित्रपटाचे प्रमोशन झाले नाही असे वाटते ती लोकं वेगळ्याच गटातील आहे. मुळात अशा लोकांची संख्या एक ते दोन टक्के आहे. बाकीच्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सांगतील खरे काय आहे ते.
जे कुणी बोलत आहेत त्यांना आपण थांबवू शकत नाही. चित्रपट क्षेत्रातील माणूसच ज्यावेळी म्हणतात आम्हाला काही माहिती नाही. ती हास्यापद गोष्ट आहे. दोन मराठी चित्रपट होते. कुठे जास्त होते. बाकीच्या वेळी सहा सहा चित्रपट असतात त्यावेळी कुणी बोलत नाहीत. असा प्रश्न मला पडतो. '
निर्माता दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांचा TDM या चित्रपटात नायिका कालिंदी आणि नायक पृथ्वीराज हे मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट पुन्हा लवकरच बॉक्स ऑफिसवर रिलिज करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.