TDM Screenings: 'माफ करा 'TDM' प्रदर्शन थांबवतोय!' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेचा निर्णय

या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले.
TDM Movie Director Bhaurao Karhade screening
TDM Movie Director Bhaurao Karhade screening
Updated on

TDM Movie Director Bhaurao Karhade screening : ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक म्हणून भाऊ कऱ्हाडेचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे.

टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. २८ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊनं बोलून दाखवली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

TDM Movie Director Bhaurao Karhade screening
TDM Movie Director Bhaurao Karhade screening

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून भाऊनं प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यानं येत्या काळात आपण टीडीएचे शो मागे घेत असल्याचे सांगून प्रेक्षकांना सांगितले आहे. मेकर्सच्या वतीनं एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला 'टीडीएम' सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी 'टीडीएम'चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

TDM Movie Director Bhaurao Karhade screening
TDM Movie Director Bhaurao Karhade screening

तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार! अशा शब्दांत दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. टीडीएमला स्क्रिन न मिळाल्यानं कलाकारांनी काही दिवसांपूर्वी थिएटरमध्येच रडत आपले गाऱ्हाणे मांडले होते.

यामध्ये कलाकारांनी मराठी चित्रपटांवर कशाप्रकारे अन्याय होतो आहे. हे प्रेक्षकांना सांगितले होते. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील टीडीएमला पुरेशा स्क्रिन्स देण्यात याव्यात. असे ट्विट केले होते.

TDM Movie Director Bhaurao Karhade screening
kiran mane: 'TDM'ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला… किरण माने आज स्पष्टच बोलले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.