Teacher's Day 2023: फिल्मी दुनियेत लोकप्रिय होण्याआधी हे कलाकार होते शिक्षक!

Teacher's Day 2023:
Teacher's Day 2023:Esakal
Updated on

Teacher's Day 2023: 5 सप्टेंबर हा दिवस भारतात खूप खास असतो कारण हा दिवस दरवर्षी भारतात 'शिक्षक दिन' म्हणुन साजरा केला जातो. बॉलिवूडनेही शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट कराणारे अनेक चित्रपट तयार केले आहे.

जे आजही मोठ्या आवडीने प्रेक्षक पाहतात. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही शिक्षकाची भुमिका चांगल्यारित्या पार पाडली आहे.

बलिवूडच्या असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर येण्यापुर्वी अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम केली आहेत. यात काही डॉक्टर किंवा इंजिनिअर होते. त्याचबरोबर असे अनेक कलाकर आहेत ज्यांनी यापुर्वी शिक्षक म्हणून काम केले आहे.

आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनानिमीत्त अशा काही कलाकाराबद्दल जाणून घेवुया ज्यांनी यापुर्वी शिक्षक म्हणुन काम केले आहे.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा सध्या त्याच्या OMG 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयने चित्रपटात येण्यापुर्वी अनेक काम केली आहेत. मात्र त्याचबरोबर अक्षय एक शिक्षक देखील आहे. बँकॉकमध्ये असताना त्यांने मुलांना मार्शल आर्टचे धडे दिले आणि मुंबईत परतल्यावर मुलांसाठी मार्शल आर्ट स्कूल सुरु केले.

सान्या मल्होत्रा

आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने फार कमी कालावधीत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. तिला डान्सची खुप आवड होती त्यामुळे तिने कॉलेजला असतांना नृत्यदिग्दर्शन सोसायटीमध्ये काम केले. ती एका बॅले कंपनीत डान्स शिक्षिका झाली होती. त्याचबरोबर ती तिच्या परिसरातील मुलींना योगा शिकवला होता.

Teacher's Day 2023:
Crime News : सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवुन शरीरसंंबंधाची केली मागणी, मुंबईत राहणाऱ्या अभिनेत्रीने पोलिसात केली तक्रार दाखल

नंदिता दास

बॉलिवूडसोबत अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमे करुन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या नंदिता दास यांचा सामावेश सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटात काम केले आहे. यापुर्वी त्या शिक्षिका होत्या. नंदिता यांची ऋषी व्हॅली नावाची शाळा होती. तिथे त्या मुलांना शिकवायच्या.

अनुपम खेर

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे देखील अभिनेत्याबरोबर एक शिक्षक आहे. त्यांची 'Actor Prepares' नावाची ड्रामा स्कुल आहे. ही स्कुल त्यांनी 2005 मध्ये उघडली.तिथे अनुपम हे मुलांना अभिनयाचे धडे देतात. या शाळेत दीपिका पदुकोण, वरुण धवन, अभिषेक बच्चन, कियारा अडवाणी आणि हृतिक रोशन यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्सनी अभिनयाचे धडे घेतले असल्याचं बोललं जातं.

Teacher's Day 2023:
Super Human Weapon Teaser: 'बाहुबली'ला मारणारा 'कटप्पा' इज बॅक! सुपर ह्युमनचा टिझर रिलिज...

चंद्रचूड सिंग

'जोश' आणि 'माचीस' सारख्या चित्रपटांमधुन लोकप्रिय झालेले अभिनेते चंद्रचूड सिंग हे बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी डेहराडूनमधील एका शाळेत संगीत विषयाचे शिक्षक होते. चित्रपटात कार्यरत असतांना त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर ते अभिनय क्षेत्रापासून लांब गेले. त्यानंकर त्यांनी पुन्हा एकदा मुलांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली.

Teacher's Day 2023:
Jawan: साऊथ इंडियन पेहरावात शाहरुख मुलीसह वेंकटेश्वर मंदिरात, जवान हिट होण्यासाठी देवाला साकडं

कादर खान

त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते कादर खान 1970-75 या काळात महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी मुंबईतील एका महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगचे आणि नंतर दुबईतील एका शाळेत हिंदीचे शिक्षण घेतले. अभिनयात येण्यापुर्वी ते हरियाणातील एका शाळेत क्रिकेटचे कोच होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()