Tejas OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेला कंगनाचा 'तेजस' ओटीटीवर धडकणार! कधी आणि कुठे पहाल?

Tejas OTT Release: 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Tejas
Tejas Esakal
Updated on

Tejas OTT Release: बॉलीवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी तिच्या चित्रपटामुळे तिचीच चर्चा होत असते. सध्या कंगनाचे सिनेमेही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहे.

तिचा 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगनाने खुप मेहनत घेतली मात्र तितका चांगला प्रतिसाद तिच्या सिनेमाला मिळाला नाही.

इतकंच नाही तर कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाला 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 70 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स 5.6 कोटींचा व्यवसाय केला.

Tejas
Amitabh Bachchan : केबीसीचं होस्टिंग करण्यासाठी 'बिग बीं 'ना किती मानधन मिळतं माहितीये?

चित्रपटगृहात तर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही मात्र आता कंगनाचा 'तेजस' ओटीटीवर धडकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 5 जानेवारीला ZEE5 वर प्रदर्शित होईल. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल ते आता घरबसल्या OTT वर हा सिनेमा पाहू शकतात.

सर्वेश मेवाडा दिग्दर्शित तेजस चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज करत RSVP Movies ने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही बातमी दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिले की, 'आपल्या देशाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत. 'तेजस'चा प्रीमियर 5 जानेवारीला फक्त ZEE5 वर होईल. 'तेजस' ची कथा तेजस गिलची आहे.

Tejas
Actor Kamar de los Reyes dies: 'वन लाइफ टू लिव्ह' फेम टीव्ही अभिनेत्याचे वयाच्या 56व्या वर्षी निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

‘तेजस’ नंतर कंगना राणौतने आता तिच्या पुढच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट यापूर्वी नोव्हेंबरमध्येच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.

मात्र आता या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कंगना इमर्जन्सी चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबत तिने आर माधवन सोबतही एक सिनेमा साईन केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.