Exclusive: 'बॅन लिपस्टिक' चळवळ ही फेमिनिझमसाठी? जाणून घ्या सत्य...

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं ईसकाळशी बोलताना केला यामागचा खुलासा...
Sonali Khare,Tejaswini Pandit
Sonali Khare,Tejaswini PanditGoogle
Updated on

तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit) आणि सोनाली खरे(Sonali Khare) या दोन अभिनेत्रींनी काल सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला,ज्याचं कॅप्शन होतं 'बॅन लिपस्टिक. ज्या व्हिडीओत या दोघी म्हणतायत,''आम्ही लिपस्टिकचं समर्थन करीत नाही,बॅन लिपस्टिक''. आणि दोघीही आपल्या ओठांवर लावलेली लिपस्टिक अक्षरश: पुसून टाकताना दिसतायत. अशाप्रकारे व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे नेमकं काय घडलंय ते कळत नव्हतं. बरं यांना अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही सपोर्ट करणारा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिही आपली लिपस्टिक पुसून टाकते आहे.

प्रथमदर्शनी तरी वाटतंय की आता असा नेमका कोणता स्त्रीवाद निर्माण झालाय की सगळ्या अभिनेत्री पेटून उठल्यात. पुन्हा कोणा अभिनेत्रीला निर्मात्या-दिग्दर्शकाच्या हीन वागणूकीला बळी पडावे लागलेय की काय असा प्रश्न सगळ्यांच्याच चेह-यावर निर्माण झाला. कारण गेल्या काही दिवसात नव्यानं करिअर करणा-या अभिनेत्रीकडे निर्मात्याने शरीरसुखाची मागणी केली होती,ज्यावरनं वाद रंगला होता. म्हणून की काय मराठी अभिनेत्री सपोर्ट करण्यासाठी आवाज उठवून एक वेगळी चळवळ सुरू करत आहेत की काय असे वाटून गेले. अर्थात काहींनी 'नवीन सिनेमा आणत आहात का?' असा चाणाक्ष प्रश्न विचारला तेजस्विनीला. तर वाचकहो,ईसकाळनं थेट तेजस्विनीशी संपर्क करून तिच्याकडूनच जाणून घेतलं की नेमंक या 'बॅन लिपस्टिक' मागे दडलंय काय?

Sonali Khare,Tejaswini Pandit
'बिचुकले' हे काय आडनाव आहे;शेट्टींच्या शमिताला 'मराठी' नावाचे वावडे!

तेजस्विनी पंडित म्हणाली,''बॅन लिपस्टिक हे प्रमोशन आम्ही आमच्या नवीन येणा-या वेब शो साठी करतोय. या वेब शो मध्ये मी आणि सोनाली खरे काम करतोय. तर या वेब शो चं दिग्दर्शन संजय जाधव करीत आहेत. यामध्ये 'लिपस्टिक' ही व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे. 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असंही तिनं नमूद केलं. उद्या सोशल मीडियावरनंच या वेब शो संदर्भातली माहिती दिली जाईल असंही तिनं सांगितलं.

तेजस्विनी पंडीत याआधी ओटीटी प्लॅटफॉ़र्मवरनं आपल्या भेटीस आलेली आहे. तिनं 'समांतर' या वेबसिरीजमध्ये स्वप्निल जोशीसोबत काम केले आहे. तर 'मी सिंधुताई सपकाळ' या तिनं महत्त्वाची भूमिका साकारलेल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर सोनाली खरे हिचं या वेब शो च्या निमित्तानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.