Animal Movie: मुंबई आता जुनी झालीय, आम्ही पाच वर्षात तुमच्या...रणबीरला तेलंगाणाच्या मंत्र्यांनी सुनावलं

अ‍ॅनिमल या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता जिथे चित्रपटाचे कलाकार आणि दक्षिण चित्रपटातील कलाकार आणि मंत्री मल्ला रेड्डी देखील आले होते.
Minister sparks controversy at Animal event:
Minister sparks controversy at Animal event:Esakal
Updated on

Minister sparks controversy at Animal event: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या सर्व कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतच हैदराबादमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

यावेळी रणबीरपासून दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगापर्यंत सर्वांनी अनेक रंजक खुलासे केले. या कार्यक्रमात सुपरस्टार महेश बाबू आणि ज्येष्ठ दिग्दर्शक एस.एस. राजामौलीही उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी असं काही वक्तव्य केले की त्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे.

Minister sparks controversy at Animal event:
Dilip Prbhavalkar: हे माझं भाग्य... लोकशाहीर विठ्ठल उमप 'मृद्गंध' जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना दिलीप प्रभावळकर भावुक

तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी या कार्यक्रमात म्हणाले, "रणबीर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. येत्या पाच वर्षांत तेलुगू लोक संपूर्ण भारतावर, बॉलीवूडवर, हॉलिवूडवर राज्य करतील. तुम्हालाही वर्षभरानंतर हैदराबादला शिफ्ट व्हावे लागेल, कारण मुंबई आता जुनी झाले आहे. बेंगळुरूमध्ये जरा ट्रॅफिकची समस्या आहे. भारतात एकच शहर आहे, ते म्हणजे हैदराबाद."

Minister sparks controversy at Animal event:
Happy Birthday Yami Gautam: अभिनयात नव्हे तर ‘या’ क्षेत्रात असती यामी...

लोकांना रेड्डी यांचे विधान पटले नाही. त्यांनी रेड्डी यांना सोशल मिडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे रणबीर कपूरच्या हावभावाचे कौतुक होत आहे. कारण जेव्हा रेड्डी हे बोलत होते तेव्हा रणबीरने ते शांतपणे ऐकले आणि त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

Minister sparks controversy at Animal event:
Gippy Grewal: 'मी सलमानचा मित्र नाहीच..', लॉरेन्स बिश्नोई गँगने घरावर गोळीबार केल्यानंतर गिप्पी ग्रेवाल घाबरला!

अनेक चाहत्यांच्या सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे. एका यूजरनं X वर लिहिले की, 'इतका धीर धरल्याबद्दल रणबीरला सलाम.' तर दुसऱ्याने लिहिले, 'सर्व हिंदी भाषिक मित्रांसाठी, तो एक राजकारणी आहे. त्यांना मते हवी आहेत.' अनेकांनी मल्ला रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.

अ‍ॅनिमल 1 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. 'अ‍ॅनिमल' 1 डिसेंबरला हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.