Sameer Wankhede: समीर वानखेडेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा, मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमधून ही माहिती समोर येतेय.
sameer wankhede, sameer wankhede case update, aaryan khan case update, kranti redkar
sameer wankhede, sameer wankhede case update, aaryan khan case update, kranti redkarSAKAL
Updated on

Sameer Wankhede Case Update News: आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमधून ही माहिती समोर येतेय.

अखेर या प्रकरणावर मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असून २२ मे पर्यंत अटक करू नये, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय.

(Temporary relief to Sameer Wankhede from aaryan khan case arrest, important decision of Bombay High Court)

समीर वानखेडे यांचे वकील म्हणाले, हे सर्व आरोप खोटे आहेत, शाहरुखच्या चॅटमध्ये आमिषाचा उल्लेख नाही. सीबीआयला देखील विचारणा केली. त्यांचे वकील हजर होते. ही पूर्ण केस, जे आरोप झाले आहेत ते चुकीचे आहेत.

त्याला कुठलाही पुरावा नाही, एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्या अधिकारात काम केले आहे. वानखेडे यांनी चुकीचे निर्णय घेतले आहे असं त्यांनी म्हटलंय.

मात्र त्यात काही तथ्य नाही. चार महिन्यानंतर ती तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला काही अर्थ नाही. लाच घेणारा एक आहे तर देणारा पण कोणीतरी असेल ना ?

कोर्टासमोर हे सगळं सांगण्यात आले आहे. आता एनसीबीनं वेळ मागितला आहे. २२ पर्यत अटक केली जाणार नाही. याप्रकरणात एनसीबी काय तपास करणार हे पाहणं महत्वाचे आहे.

sameer wankhede, sameer wankhede case update, aaryan khan case update, kranti redkar
Aai Kuthe Kay Karte: १००० भागांची झाली 'आई', आज विशेष भाग प्रदर्शित
sameer wankhede, sameer wankhede case update, aaryan khan case update, kranti redkar
Amitabh Bachchan: अखेर डॉनला पोलीसांनी अटक केलीच... हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट चर्चेत

मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखने विनंती केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आल्याची धक्कायक माहिती पुढे येतेय.

समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर आलेलं आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती.

या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()