Thalapathi Vijay Leo: थलपथी विजयच्या 'लिओ'ची दहशत! प्रदर्शनासाठी तामिळनाडू सरकारने दिले निर्देश

Thalapathi Vijay Leo No early morning shows for  ‘Leo’ Police to take action against violators
Thalapathi Vijay Leo No early morning shows for ‘Leo’ Police to take action against violatorsEsakal
Updated on

Thalapathi Vijay Leo: थलपथी विजयच्या लिओ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात विजयसोबत संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन सर्जा आणि प्रिया आनंद हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. लिओ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची क्रेझ आणखीच वाढली.

थलपथी विजयच्या चाहत्यांमध्ये 'लिओ' चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या चित्रपटाची क्रेझ तामिळनाडूमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की लिओ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ चित्रपटगृहच नाही तर पोलीस आणि प्रशासनालाही विशेष तयारी करावी लागली आहे.

ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला तेव्हा तिथल्या चाहत्यांनी उत्साहाच्या भरा थिएटरमधील खुर्च्या फोडल्या आणि थिएटरची नासधुस केली होती.

आता मिडिया रिपोर्टनुसार, चेन्नई पोलिसांनी चित्रपट रिलिज झाल्यानंतर नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे, जी ट्रेलर रिलीजच्या दिवशी जे काही घडले तसे चित्रपटगृहांमध्ये किंवा थिएटरच्या बाहेर घडू नये याची खात्री करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेन्नई पोलीस विभागाने ही विशेष टीम तयार केली आहे.

Thalapathi Vijay Leo No early morning shows for  ‘Leo’ Police to take action against violators
Box Office Collection: 'मिशन राणीगंज','जवान' की फुकरे.. 'नॅशनल सिनेमा डे'चा फायदा कोणत्या चित्रपटाला?

तर लिओ चित्रपटाच्या रिलिजपुर्वी राज्य सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने पहाटे 4 वाजता शो चालवण्याची परवानगी दिलेली नाही. चित्रपटाचा पहिला शो रात्री 9 वाजता सुरू होईल.

रात्री दीड वाजेपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन करता येणार आहे. तर दुसरीकडे सिनेमागृहाच्या मालकांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि पार्किंगची योग्य व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तर सुरक्षेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तर पोलिसांनी सिनेमागृहाच्या मालकांना जास्त किमतीत तिकीटाची विक्री न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

इतकच नाही तर सर्व सिनेमागृह मालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

Thalapathi Vijay Leo No early morning shows for  ‘Leo’ Police to take action against violators
Navratri 'Garbo' Song: आता पंतप्रधानांच्या गाण्यावर होणार दांडिया ! खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला 'या' गायिकेने दिलाय आवाज

गर्दीच्या आडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशा सूचना चेन्नईचे पोलीस आयुक्त संदीप राय राठोड यांनी दिली आहे.

थलपथी विजय आणि लोकेश कनागराज यांचा लिओ हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2023 रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. यूके आणि यूएस मध्ये एक विशेष प्रीमियर शो होईल.

हा चित्रपट तेलगू, कन्नड आणि मल्याळमसह मूळ भाषेत तामिळमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त व्हिलनच्या भुमिकेत विजयसोबत भिडताना दिसणार आहे. अर्जुन सर्जा आणि त्रिशा यांच्यादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Thalapathi Vijay Leo No early morning shows for  ‘Leo’ Police to take action against violators
Marty York: सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या आईची राहत्या घरी हत्या, उडाली एकच खळबळ

लिओमध्ये अत्यंत हिंसक आणि रक्तरंजित दृश्ये आहेत. हा चित्रपट केवळ 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनी आणि हृदयविकाराचा त्रास नसलेल्या लोकांनी पहावा अशा सुचना चित्रपटाच्या रिव्ह्यूनंतर प्रेक्षकांना करण्यात आल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.