Thalapathy 67 Tollywood movie sanjay Dutt Trisha Vijay Setupathy : बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद हा गेल्या काही महिन्यांपासून रंगलेला असताना त्यात संजु बाबाच्या एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी त्यानं केजीएफमधून चाहत्यांना आगळी वेगळी पर्वणी दिली होती. त्यानंतर आता तो तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
अलीकडेच प्रॉडक्शन हाऊस 7 स्क्रीन स्टुडिओने थलापथी विजयसह आपला आगामी चित्रपट 'थलापथी 67'ची घोषणा केली आहे. या सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. अशातच, प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये संजय दत्त, अर्जुन, गौतम मेनन, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान आणि त्रिशा कृष्णन यांचा समावेश आहे.
Also Read - ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले
अॅक्शन थ्रिलर असलेला 'थलापथी 67'च्या निर्मात्यांनी चित्रपटाविषयी एक रोमांचक माहिती देऊन दर्शकांची उत्सुकता वाढवली आहे. अशातच, सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटात संजय दत्त सामील झाल्याची घोषणा केली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, संजू सर हे फायनली तमिळ चित्रपटामध्ये येत आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. आम्हाला थलापती ६७ ची घोषणा करताना आनंद होतो आहे.
तसेच, या प्रोजेक्टमध्ये थलापथी विजय सर आणि त्रिशा कृष्णन यांची उत्कृष्ट ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार असून, 'थलापथी 67'या चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र येत आहेत. याबद्दल प्रेक्षकांना अपडेट देत निर्मात्यांनी सोशल मीडियावर त्रिशा कृष्णनचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले,
'थलापथी 67'हा खरोखरच एक खास प्रोजेक्ट आहे कारण 'मास्टर' आणि 'वरिसु' या दोन ब्लॉकबस्टर्सनंतर थलापथी विजय सर आणि 7 स्क्रीन स्टुडिओ यांचे तिसरे सहकार्य चिन्हित करतो. तसेच, या सिनेमाद्वारा थलापथी विजय आणि लोकेश कनागराज पुन्हा एकत्र आले आहेत. यांनी यापूर्वी ‘मास्टर’या चित्रपटात एकत्र काम केले असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
7 स्क्रीन स्टुडिओच्या 'थलापथी 67'या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली असून, याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.