In Raahon Mein: अरिजितच्या जादुई आवाजात सजलंय 'इन राहों में'! 'द आर्चीज'मधील गाणं ऐकाच

The Archies
The Archies Instagram
Updated on

Arijit Singh sings In Raahon Mein: झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. 'द आर्चिज'मधून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अशी अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत ज्यात 'सुनोह' आणि 'वा वा वूम' नंतर आता 'द आर्चिज'चे तिसरे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव आहे 'इन राहों में'.

The Archies
Bigg Boss 17: बिग बॉसनं घरातल्या मंडळींना दिला 'जोर का झटका'! 'या' स्पर्धकाचा पत्ता झाला कट..

अरिजित सिंगने अबुधाबीमध्ये नुकत्याच झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 'द आर्चीज' मधील 'इन राहों में' गाणे गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तेव्हा 'द आर्चिज'चा 'इन राहों में' अजून रिलीज झाला नव्हते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत झाले. दरम्यान आता निर्मात्यांनी हे गाणे रिलिज केले आहे.

The Archies
Vir Das Landing On OTT: 20 देशांना हरवत एमी पुरस्कार जिंकणारा वीर दास आहे तरी कोण? विनिंग कॉमेडी सिरिज कोणत्या OTT वर येणार पाहता?

अरिजित सिंगने आपला जादुई आवाज 'इन राहों में' या गाण्याला दिला आहे. तर या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. 'द आर्चीज' हा चित्रपट येत्या 7 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलिज करण्यात येणार आहे.

सुहाना, खुशी आणि अगस्त्य यांच्यासोबतच मिहीर आहुजा, वेदांग रैना, आदिती सहगल हे देखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 'द आर्चीज' लोकप्रिय कॉमिक 'द आर्ची' वर आधारित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()