The Archies Teaser: प्रेमात वाद अन् ब्रेकअपची जुन्या काळातली गोष्ट! नेपोबेबीजच्या द आर्चीजचा टिझर रिलिज...

The Archies Teaser out
The Archies Teaser outEsakal
Updated on

The Archies Teaser: झोया अख्तर दिग्दर्शित नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा 'द आर्चिज' सिनेमाचा टिझर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे.

काही दिवसांपुर्वी या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलिज करण्यात आलं होतं. ज्यामुळे चित्रपटाच्या कलाकरांवर खुपच टिका करण्यात आली होती.

कारण या चित्रपटात सर्व स्टार किड्सची जत्रा भरली असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. या चित्रपटात शाहरुखची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान(Suhana Khan),दिवंगत श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

The Archies Teaser out
Father's Day 2023: वडिलांची फसवणूक, घरावर जप्ती, लाखोंचं कर्ज.. गश्मीरने वडिलांचा भार घेतला डोक्यावर

ब्राझीलमध्ये नेटफ्लिक्सच्या टुडम इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. झोया अख्तरचा हा चित्रपट प्रसिद्ध 'आर्चीज कॉमिक्स' यातुन घेण्यात आला आहे.

दरम्यान द आर्चीजचा टीझर सोशल मिडियावर देखील रिलिज करण्यात आला आहे. द आर्चीजचा टिझर एक मिनिटाचा आहे, जो रिव्हरडेल नावाच्या हिल स्टेशनपासून सुरू होतो.

The Archies Teaser out
Father's Day 2023: बाबा जाऊ नको दूर! वडिलांसोबत नातं अधिक घट्ट करणारे 'हे' चित्रपट नक्की पहा..

ट्रेन स्टेशनवर येते आणि पुढच्या सीनमध्ये काही विंटेज आणि रेट्रो कार दिसतात. त्यानंतर अनेक वेगवेगळे शॉट्स दिसत टिझरमध्ये दिसतात. त्यात अगस्त्य नंदा ही गिटार वाजवतानांही दिसत आहेत, तर सुहाना खान आणि खुशी कपूर मस्त डान्स करताना दिसत आहेत.

'द आर्चिज'  या चित्रपटाची कथा 1964 मधील आहे. टिझरमध्ये तुम्हाला रेट्रो फील नक्कीच येतो.

मग ते चित्रपटातील कलाकारांचे कपडे असो, त्यांच्या हेयरस्टाईल किंवा आजूबाजूच्या गोष्टींमध्ये तुम्ही या टिझरमध्ये अनुभवता येणार आहे. सुहाना आणि खुशीसह सर्व पात्रांचा प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतचा असा सर्व प्रवास करताना दिसतात.

The Archies Teaser out
Bigg Boss OTT 2: आता रोजच होणार राडे अन् वाद बिग बॉस ओटीटीला झाली दणक्यात सुरुवात!

Netflix ने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर चाहत्यासोबत शेअर केला. त्यात त्यांनी लिहिलं की तुम्ही तिला कॉमिक्स, पुस्तकांमध्ये आणि रिव्हरडेलमध्ये पाहिले आहे. पण यावेळी, तुम्ही तिला भारतात पाहणार आहात. 60 च्या दशकातला सेट , द आर्चीज एक जग तयार करतयं जे ओळखीच आणि काहीस नवं दोन्ही प्रकराचं आहे.

सुहाना,खुशी,अगस्त्य व्यतिरिक्त मिहिर अहूजा,डॉट,वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिलिज डेट समोर आली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.