Adipurush Nepal: नेपाळमध्ये आदिपुरुषवरील बंदी उठवली, मात्र काठमांडूचे महापौर काही ऐकेना..

सीतेचा उल्लेख “भारताची कन्या” म्हणून करण्यात आला आहे, त्यामुळे सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती
The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry
The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry SAKAL
Updated on

Adipurush Nepal Banned Update News: नेपाळ न्यायालयाने गुरुवारी प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुषसह हिंदी चित्रपटांवरील बंदी उठवली.

याशिवाय देशाच्या सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन अधिकाऱ्यांनी थांबवू नये, असा निर्देश देण्यात आला. पण या निर्णयावर काठमांडूचे महापौर मात्र संतापले आहेत. बघूया काय घडलंय नेमकं...

(The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry)

The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry
Adipurush 6th day box office: कमाईची गाडी घसरली.. आदिपुरुषची सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी

ओम राऊत यांच्या आदिपुरुषचा एक संवाद, ज्यामध्ये सीतेचा उल्लेख “भारताची कन्या” म्हणून करण्यात आला आहे, त्यामुळे सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती, ज्याची घोषणा काठमांडूचे महापौर बलेंद्र शाह यांनी केली होती.

शाह यांनी गुरुवारी निर्णय आल्यावर सांगितले की ते कोणत्याही शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहेत परंतु हे प्रकरण “नेपाळच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याशी” संबंधित असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी देणार नाही.

पाटण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धीर बहादूर चंद यांच्या एकल खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन थांबवू नये, असा अल्पकालीन आदेश दिला.

नेपाळ मोशन पिक्चर असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर ढुंगाना यांनी माध्यमांना सांगितले की, याचिकाकर्ते न्यायालयाच्या लेखी आदेशाची वाट पाहत आहेत.

The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry
भसाड्या आवाजात लाफ्टर काढणारी बिवाली Priyadarshni Indalkar

कोर्टाने आदेश दिलाय की, “आता आम्ही सेन्सॉर बोर्डाने पास केलेले सर्व चित्रपट प्रदर्शित करू.”

आदिपुरुष आणि इतर हिंदी चित्रपटांवर सोमवारी नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली होती, ज्यात सीता (क्रिती सेननने साकारलेली) “भारताची कन्या” असा उल्लेख केल्याच्या संवादांवरून वाद निर्माण झाला होता."

कोर्टाने दिलेल्या आदेशावर काठमांडूचे महापौर बलेन्द्र शाह म्हणाले, “चित्रपटाच्या लेखकाने नेपाळ भारताच्या अखत्यारीत असल्याचे म्हटले आहे, यावरून भारताचा वाईट हेतू स्पष्ट होतो.

याला नेपाळ सरकारच्या न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्याच्या बाजूने आदेश देणे म्हणजे नेपाळ एकेकाळी भारताच्या अधिपत्याखाली होता याशिवाय न्यायालय आणि सरकार हे दोघेही भारताचे गुलाम आहेत, हे मान्य करणे होय", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

The ban on Adipurush was lifted in Nepal, but the mayor of Kathmandu angry
Saif With Sara: बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदा एकत्र, जाणून घ्या

"मी यासाठी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे, परंतु आदिपुरुष चित्रपट चालणार नाही आणि चालवू दिला जाणार नाही," असं ठाम मत बलेन्द्र शाह यांनी व्यक्त केलं. आता कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पडसाद काय उमटतात,

आणि आदिपुरुष सिनेमावरील बंदी उठवली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. T-Series, Retrophiles आणि UV Creations द्वारे निर्मित, या चित्रपटात सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.