The Battle Story of Somnath : सोमनाथ मंदिरावरील हल्ला, महंमद गझनीच्या कृष्णकृत्याची कहाणी सांगणारा चित्रपट

मनीष मिश्रा आणि रंजित शर्मा यांनी द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याची गेल्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे.
The Battle Story of Somnath
The Battle Story of Somnath esakal
Updated on

The Battle Story of Somnath : ऐतिहासिक कालखंडामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख मोठ्या गांभीर्यानं केला जातो तो कालखंड म्हणजे महंमद गझनीचा. त्यानं १०२५ मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता. आता त्या सगळ्या कालखंडाविषयी प्रभावी भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो आहे. The Battle Story of Somnath movie

मनीष मिश्रा आणि रंजित शर्मा यांनी द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याची गेल्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर या चित्रपटावरून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मिश्रा आणि शर्मा यांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे. गझनीनं सोमनाथ मंदिरावर केलेला हल्ला हा भारताच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून ओळखला जातो. त्यानं भारतातील मोठया ऐतिहासिक परंपरेला धक्का दिला होता.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

१५ जुलै रोजी २०२३ रोजी श्रावणातल्या पहिल्या शिवरात्रीच्या निमित्तानं आता मनिष मिश्रा आणि रंजीत शर्मा यांनी या आपल्या महत्वांकाक्षी चित्रपटाविषयी प्रेक्षकांना सांगितले आहे. २ इडियट फिल्म्सच्या बॅनरच्या वतीनं द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथची निर्मिती होणार आहे. यापूर्वी या बॅनरनं मिशन लैला, ये मर्द बेचारा सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ नावाचा चित्रपट पॅन प्रोजेक्ट असणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना अनूप थापा यांनी सांगितले की, या चित्रपटाची कथा महंमद गझनी आणि त्याच्या कृत्याविषयी भाष्य करते. भारतीय इतिहासातील अनेक अज्ञात पैलू या चित्रपटाच्या निमित्तानं पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आलेले नव्हते.

The Battle Story of Somnath
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट शेयर केली आहे. त्यांनी चित्रपटाचा अॅनिमेटेड टीझर शेयर केला आहे. पावणेदोन मिनिटांचा व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्यामध्ये गझनीनं सोमनाथ मंदिरावर हल्ला करणे ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची निर्मिती या साऱ्या गोष्टींचा संदर्भ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

The Battle Story of Somnath
Prabhas Birthday: आदिपुरुष फ्लॉप झालाय पण टेन्शन नाय, परदेशातला व्हीला भाड्याने देऊन प्रभास कमावतोय कोट्यवधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.