The Diary Of West Bengal: 'माझी जेलमध्ये हत्या होऊ शकते..', 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या दिग्दर्शकाच्या पोस्टनं खळबळ

'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा लोकांना भडकावण्याचं काम करू शकतो असा आरोप केला जात आहे.
The Diary Of West Bengal Controversy
The Diary Of West Bengal ControversyEsakal
Updated on

The Diary Of West Bengal: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' वरनं सुरू असलेला वाद थांबत नाहीय तर आता 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' वरनं नवा वाद छेडला गेला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना भीती आहे की पश्चिम बंगालमध्ये ते गेले तर त्यांची हत्या केली जाईल.

सनोज मिश्रानं हा देखील आरोप केला आहे की त्याला जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं,आणि तिथेच त्यांची हत्या केली जाऊ शकते. सनोज मिश्रा यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधनं सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीसाठी हाक मारली आहे.

बातमी आहे की,सनोज मिश्राच्या विरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली गेली होती. त्यांच्यावर आरोप केला गेला होता की 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या माध्यमातून त्यांनी पश्चिम बंगालची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे.(The Diary Of West Bengal Controversy director sanoj mishra fears he might get killed in jail)

The Diary Of West Bengal Controversy
Janhvi Kapoor: 'फुलपाखरु छान किती दिसते..'
The Diary Of West Bengal Controversy
Nushrratt Bharuccha: 'मी आज फूल झाले..'

तक्रारीनंतर सनोज मिश्राला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. सनोज मिश्रा यांचे म्हणणे आहे की त्यांचा सिनेमा पाहिल्याशिवायच फक्त ट्रेलर पाहून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली गेली.

आता त्यांना जेलमध्ये देखील दाखल केलं जाऊ शकतं. सनोज मिश्रानं हे देखील सांगितलं की जर त्यांना बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं तर त्यांना मारलं देखील जाऊ शकतं. जर त्यांना काही झालं तरी आंदोलन थांबायला नको.

सनोज मिश्रा यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर लांबलचक पोस्ट लिहिली आहे,ज्यात त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. सनोज मिश्रांनी सांगितलं आहे की,''त्यांना खरं बोलण्यासाठी हा त्रास दिला जात आहे. त्यांनी सिनेमा बनवून कोणताच अपराध केलेला नाही''.

The Diary Of West Bengal Controversy
Kushal Badrike:'मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा पण त्याआधी..', कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

सनोज मश्रा यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे की, ''स्वतंत्र भारतात आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे,पण आजही शासन चालवणारे काही हुकूमशाह देश आणि देशाच्या नागरिकांना आपला गुलाम समजतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवूनच मी तीस वर्षापूर्वी आपलं घर सोडून मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमवायला आलो होतो''.

''माझा सिनेमा 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'ला पाहिल्याशिवायच ट्रेलरच्या आधारावर बंगालमध्ये माझ्या विरोधात एफआयआर दाखल केली गेली आहे. मला जेल होऊ शकते आणि तिथेच माझी हत्या केली जाऊ शकते. मी फक्त एक सिनेमा बनवला आहे,अपराध नाही केला. ना माझ्या नावावर कोणता गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. खरं बोलण्यामुळे मला त्रास दिला जात आहे''.

'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या ट्रेलरमध्ये दावा केला गेला होता की बंगालमध्ये हिंदू लोकांना जीवे मारण्यात आले होते, ज्यानंतर तिथे सामुहिक बलात्काराच्या घटना देखील घडल्या.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की बंगालमध्ये काश्मिरपेक्षा देखील भयानक घटना घडल्या आहेत आणि यामुळे बंगालमधून हिंदू लोकांनी भीतीनं पळून जाण्यास सुरुवात केली होती.

ट्रेलरमध्ये एक महिला देखील दाखवली आहे,जी हुबेहूब पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सारखी दिसत आहे. आणि यावरनंच मोठा वाद पेटला. सनोज मिश्रांनी सांगितलं की ते दीदी म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नाहीत,तर त्यांचा लढा सिस्टम विरोधात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.