जाडं असणं वाईट नाही! फॅमिली मॅनच्या प्रियामणिनं नेटकऱ्यांचे टोचले कान

राज डीके यांच्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजला (entertainment news) चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
Priyamani news
Priyamani newsesakal
Updated on

The family man web serise: राज डीके यांच्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजला (entertainment news) चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतीय वेब सीरिजमध्ये ज्या लोकप्रिय मालिका आहेत त्यामध्ये फॅमिली मॅनचा क्रमांक वरचा (bollywood) आहे. क्राईम, थ्रिलर, विनोदी अशा वेगवेगळ्या रंगा ढंगातील या मालिकेचे आतापर्यत दोन सीझन प्रदर्शित झाले असून त्या दोन्ही सीझनला (Priyamani Actress) प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मनोज वाजपेयी, समंथा अक्कीनेनी, प्रियामणि, शरद केळकर यांच्या भूमिका असलेल्या फॅमिली (Bollywood Actors) मॅनच्या तिसऱ्या पर्वाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. आता या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री जिनं फॅमिली मॅनमधील प्रमुख अभिनेता मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली होती, त्या प्रियामणिनं नेटकऱ्यांना बॉडी शेमिंग या प्रकरणावरुन चांगलेच सुनावले आहे.

प्रियामणिनं एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाडेपणावर भाष्य केले आहे. तिनं आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये माझ्या दिसण्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याची खंत प्रियामणिनं यावेळी त्या मुलाखतीतुन मांडली आहे. ती म्हणते, जाडं असणं काही वाईट नाही. आपण जसे असतो त्याचा स्वीकार आपण केला की अनेक प्रश्न सुटतात. मात्र हे आपल्या काही लक्षात येत नाही. मग त्यावरुन आपल्याच मनात कित्येक प्रश्न तयार व्हायला लागतात. लोकं तुम्हीही काहीही करायला गेलात तरी ट्रोल करतातच. तेव्हा त्यावरुन जास्त विचार करण्याची गरज नाही. मात्र दरवेळी लोकांचं ऐकुन घ्यायची काही गरज नाही. आपलं दिसणं आपल्या हातात आहे. हे आपण विसरता कामा नये.

Priyamani news
Viral Video : अचानक रस्त्यावरील व्यक्तीला दिसला कांगारू, भारतात आलं तरी कुठून?

जाडेपणावरुन मला नेहमी का डिवचले जाते हे काही कळत नाही. मी त्यावर मेहनत घेतली आहे. आता पहिल्यापेक्षा प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाले आहे. पण नेटकरी काही पाठ सोडायला तयार नाही. त्यांना तुम्हाला ट्रोल करण्यात आनंद मिळतो. मुळात लोकांना तुमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार कुणी दिला हा प्रश्न आहे. आता सोशल मीडिया हा प्रत्येकाचा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट त्याच्या चष्म्यातून पाहायला लागलो आहे. तो मीडिया जेवढा चांगला तेवढाच त्याचे परिणामही गंभीर असतात हे आपण समजून घ्यायला पाहिजे. असे प्रियामणिननं यावेळी सांगितलं आहे. नुसतं दिसणचं नाहीतर मला माझ्या भाषेवरूनही ट्रोल करण्यात आले आहे. एखादा दाक्षिणात्य कलाकार जेव्हा हिंदीमध्ये काम करतो तेव्हा मात्र त्याला त्याच्या भाषेवर अय्यो क्या बोलता जी...असं म्हणून हिणवलं जातं. असेही प्रियामणिनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.