Madhuri Dixit: चेहऱ्यावर हसू पण मनात दुःख.. आईच्या शोकसभेला माधुरी दीक्षित भावुक

माधुरी दीक्षितने दिवंगत आई स्नेहलता दीक्षित यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभा घेतली
madhuri dixit, madhuri dixit news, madhuri dixit
madhuri dixit, madhuri dixit news, madhuri dixit SAKAL
Updated on

Madhuri Dixit News: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे १२ मार्चला सकाळी ८.४० वाजता निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी स्नेहलता यांनी अखेरचा श्वास घेतला.

माधुरी दीक्षितने शुक्रवारी तिची दिवंगत आई स्नेहलता दीक्षित यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभा घेतली. या दुःखद प्रसंगी तिचे पती डॉ.श्रीराम नेने आणि मुलगा रायनही तिच्या सोबत होते.

(The family of Madhuri Dixit is organising a Prayer meet for her late mother )

या शोकाकुल क्षणी माधुरीचे बॉलिवूडमधील अनेक सहकारी आणि मित्र मैत्रीण उपस्थित होते. यामध्ये विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, रितेश देशमुख असे कलाकार उपस्थित होते.

याशिवाय माधुरीचे अनेक वर्षांपासूनचा सहकलाकार आणि तिचा मित्र जॅकी श्रॉफ, सुभाष घई आणि सूरज बडजात्या हे सर्व कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

madhuri dixit, madhuri dixit news, madhuri dixit
Ratna Pathak Shah Birthday: संभोग से संन्यास तक.. रत्ना आणि नसिरुद्दीन यांची कशी होती लव्ह लाईफ..

माधुरी सर्व मीडियासमोर ओझरतं हसत होती पण तिच्या मनात आईच्या जाण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. माधुरीचा पती श्रीराम आणि मुलगा रायन या सर्वांनी पांढरे कपडे घातले होते. माधुरीचा मोठा मुलगा अरिन सध्या अमेरिकेतील कॉलेजमध्ये शिकत आहे.

तो मात्र येऊ शकला नाही. शोकसभेला उपस्थित राहिलेल्या कलाकारांना माधुरी आणि तिच्या कुटुंबाने अभिवादन केले.

माधुरीचं तिच्या आईसोबत खास नातं होतं. 27 जून 2022 रोजी, माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टा वर तिची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचे फोटो पोस्ट केले होते. पहिल्या चित्रात माधुरी तिची आई आणि तिचा पती श्रीराम नेने यांच्यासोबतचा फोटो होता.

madhuri dixit, madhuri dixit news, madhuri dixit
Bhalchandra Kulkarni: कोल्हापूरची शान ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

माधुरीची आई ९० वर्षांची झाली असताना, माधुरीने तिच्या आईला वाढदिवसाच्या सर्वात सुंदर शुभेच्छा लिहिल्या.

तिनं कॅप्शन लिहिले होते की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, ते म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. ते अधिक योग्य असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुम्हाला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देतो!'

आईच्या निधनाने माधुरीच्या आयुष्यात न भरून काढता येणारी पोकळी निर्माण झालीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()