Muttiah Muralitharan Biopic: मुथय्या मुरलीधरनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट! बायोपिक फर्स्ट लूक आऊट..

हा अभिनेता साकारणार भुमिका..
Muttiah Muralitharan Biopic
Muttiah Muralitharan BiopicEsakal
Updated on

Muttiah Muralitharan Biopic: मनोरंजन विश्वात सध्या बायोपिकवर जास्त भर देण्यात येत आहे. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयूष्यावर तयार करण्यात आलेला जीवनपट पाहण्यात जास्त रस असतो. अशातच आता आणखी एका महान क्रिकेटरच्या आयूष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हा एक महान खेळाडू आहे. नुकतच त्यांच्यावर बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची घोषणा करतांना त्याचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

मुरलीधरन यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे नाव ' 800 ' (800 The Movie) असे असणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. मुरलीचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचे पोस्टर आणि नाव समोर आल्याने ते उत्साहित झाले आहे.

Muttiah Muralitharan Biopic
Diljit Dosanjh: दिलजीतचा देसी जलवा! कॅलिफोर्नियातील संगीत महोत्सवात गोऱ्यांना नाचवलं आपल्या तालावर...

या चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तल साकारणार आहे. त्याचा फर्स्ट लुकही रिलीज झाला आहे. 'स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातुन लोकप्रियता मिळवणारा मधुर आता या चित्रपटात त्याचा अभिनय दाखवेल.

Muttiah Muralitharan Biopic
Sana Khan Video: गरोदर सनाला नवऱ्याने ओढत नेलं! नेटकऱ्यांची सटकली...व्हिडिओ व्हायरल

मुरलीधरनवर बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन एमएस श्रीपाठी यांनी केले आहे. 800 हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सध्या फक्त या चित्रपटाचा नाव आणि मोशन पोस्टर रिलिज झाली आहे. मात्र या बायोपिकची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र तो याच वर्षी रिलीज होणार आहे. जर तुम्ही मुरलीचे फॅन असाल तर नक्कीच मधुर मित्तलचा फर्स्ट लूक पाहून तुम्हाला त्यांची आठवण येईल.

Muttiah Muralitharan Biopic
Shaakuntalam: तिसऱ्या दिवशी 'शाकुंतलम'नं बॉक्स ऑफिसवर सोडला जीव! जमवला फक्त इतक्या कोटींचा गल्ला

मुथय्या मुरलीधरन आज ५१ वर्षांचा झाला आहे. मुरलीधरन याच्या नावावर अनेक विक्रम आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून त्याने 1347 विकेट आहेत, जो एक विश्वविक्रमही आहे.

मुरलीधरनने कसोटीत 133 सामन्यांत सर्वाधिक 800 विकेट्स घेतल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 534 बळी घेतले आहेत. एकेकाळी मैदानात मुरलीच्या फिरकी समोर फलंदाज हादरायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.