The First Omen final trailer : हॉरर फिल्म द फर्स्ट ओमनेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात व्हायरल झालेल्या ट्रेलरनं द फर्स्ट ओमेन पाहणं काही सोपं काम (The First Omen final trailer Latest news) नसणारेय अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्या ट्रेलरवरुन नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
कित्येक नेटकरी आणि चाहत्यांनी ट्रेलरवरुन हा चित्रपट किती घाबरवून टाकणारा असेल याविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यांना हॉरर चित्रपटांची आवड असेल त्यांच्यासाठी द फर्स्ट ओमेन ही मोठी ट्रीट ठरणार आहे. तर ज्यांना अशा प्रकारचे चित्रपट आवडत नसेल त्यांनी त्याच्या वाटेला न गेलेलं बरं. त्या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.
मेकर्सचं म्हणणं आहे की ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर मुव्ही आहे. द हिंदून याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. द ओमेन या क्लासिक हॉरर फिल्मचा नवा ट्रेलर हा आता समोर आला असून त्याची निर्मिती २० सेंच्युरी स्टुडिओच्या वतीनं करण्यात आली आहे. मेकर्सनं त्यांच्या इंस्टावरुन तो ट्रेलर शेयर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, नवा ट्रेलर पाहा आणि एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जाण्यासाठी तयार राहा.
त्या पोस्टनुसार द फर्स्ट ओमान हा क्लासिक हॉरर फिल्म द ओमेनचा प्रीक्वेल असून तो पाच एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून एका अमेरिकन तरुणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे जिनं रोममधील एका चर्चमध्ये सेवा सुरु केली आहे. त्यानंतर तिला तिथं जे वेगवेगळे अनुभव येतात ते थरारकपणे द फर्स्ट ओमेनमध्ये दाखवण्यात आले आहेत.
या चित्रपटाविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास त्यात निल टायगर फ्री, टॅवेक बारहोम, सोनिया बर्गा, राल्फ इनर्सन आणि बिल निघी नावाच्या कलाकारांची टीम आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर्कश स्टीव्हनसन यांनी केले आहे. तर कथालेखक बेन जॅकोबी यांची असून स्क्रिन प्ले टीम स्मिथ यांचा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.