Box Office Collection: विकीचा सिनेमा आपटला तर शिल्पाचा 'सुखी' झाला दुखी! दुसऱ्या दिवशी कमावले किती?

The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2
The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2Esakal
Updated on

The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2: 'जरा हटके जरा बचके' या धमाकेदार चित्रपटानंतर विकी कौशल पुन्हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

या चित्रपटाचं नाव म्हणजे 'द ग्रेट इंडियन फॅमिली'. हा सिनेमा 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. विकी सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही या चित्रपटापासून खुप अपेक्षा होत्या मात्र शाहरुखच्या जवानपुढे या चित्रपटाने काही खास कमाल केली आहे.

मानुषी छिल्लर आणि विकी कौशलच्या मुख्य भुमिका असलेला 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचं दिसतयं

The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2
Parineeti Raghav Wedding: परि-राघव आज अडकणार लग्नाच्या बेडीत! हळदी-मेहंदी सोहळ्याला केली फुल धमाल! असा पार पडणार लग्नाचा सोहळा

'द ग्रेट इंडियन फॅमिली' रिलीज होऊन अवघे दोनच दिवस झाले असले तरी या चित्रपटाने काही कमाल केलेली नाही. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त1.4 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 1.80 कोटींची कमाई केली. या दोन दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता या चित्रपटाने फक्त 3.20 कोटी रुपये कमावले आहे.


The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2
Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात कोण होणार लॉक? 'बिग बॉस 17'चा धमाकेदार प्रोमो व्हायरल!

द ग्रेट इंडियन फॅमिलीचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2
Aamir Khan: मनानेही 'अमिर'! हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी मिस्टर परफेक्शनिस्टनं केला मदतीचा हात पुढे..

तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीचा 'सुखी' चित्रपट देखील 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र विकीच्या चित्रपटासारखाच हा सिनेमा देखील काही खास कमाल करु शकलेला नाही.

'सुखी' चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.3 कोटी अन् दुसऱ्या दिवशीही केवळ 0.4 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाने एकूण 0.7 कोटींची कमाई केली आहे.

तर या दोन्ही चित्रपटांना अजूनही टक्कर देत आहे तो शाहरुख खानचा 'जवान' सिनेमा. Sacknilk नुसार, 'जवान' ने रिलीजच्या 17 व्या दिवशी 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'जवान'ची एकूण कमाई आता 545.58 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही जवानची बॉक्स ऑफिसवर हवा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.