The Gray Man: 'तू सुटाबटात तर मी लूंगीत!' धनुषच्या पारंपारिक वेशभूषेनं जिंकलं

हॉलीवूडच्या वेगवेगळ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक अँथनी आणि जो रुसो यांच्या द ग्रे मॅनची चर्चा सुरु झाली आहे.
The Gray Man premiere
The Gray Man premiere esakal
Updated on

The Gray Man Movie: हॉलीवूडच्या वेगवेगळ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक अँथनी आणि जो रुसो यांच्या द ग्रे मॅनची चर्चा सुरु झाली (The Grey man premire) आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा टीझर व्हायरल झाला होता. त्यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटातील धनुषनं देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. धनुष प्रथमच हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भूमिका करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचं सर्वांना कुतूहल आहे. यापूर्वी अँथनी आणि जो रुसो यांनी (Tollywood Actor Dhanush) अॅव्हेंजर्स एंड गेम्सचे दिग्दर्शन केले आहे. त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता सर्वांना उत्सुकता द ग्रे मॅनची आहे.

काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये द ग्रे मॅनचा प्रीमिअर पार पडला होता. मुंबईतही त्याचा कौतूक सोहळा संपन्न झाला आहे. त्याला हॉलीवूड, टॉलीवूडमधील वेगवेगळे मान्यवर हजर होते. बॉलीवूडमधीलही कलाकारांनी या इव्हेंटला हजेरी लावली होती. द ग्रे मॅनची भारतात देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा (The Grey Man release date) आहे. त्याला कारण म्हणजे धनुष. धनुषचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. 15 जुलैला अमेरिकेमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर झाला. द ग्रे मॅनमध्ये रेयान गोसलिंग, क्रिस इवान्स सारखे दिग्गज अभिनेते आहेत. मुंबईत झालेल्या प्रीमिअरला धनुषनं केलेली वेषभूषा अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात तो पारंपारिक दाक्षिणात्य वेशात दिसतो आहे. त्याच्या चाहत्यांना तो लूक कमालीचा आवडला आहे. त्यांनी धनुषचे कौतूक केले आहे.

the grey man movie
the grey man movie esakal

धनुषचा तो लूक टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची लगबग सुरु होती. धनुषच्या त्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. धनुषची विनम्रता देखील सगळ्यांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाबरोबरच त्याच्या नावाची देखील चर्चा होत आहे. द ग्रे मॅनच्या प्रिमिअरला बॉलीवूडमधील विक्की कौशल, दिग्दर्शक राज डीके, रणदीप हुड्डा, सिद्धार्थ रॉय कपूर, विशाल भारद्वाज, आनंद एल राय, बाबिल खान, विहान समत, आदिती पोहनकर, अलाया एफ याशिवाय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझही हजर होती.

रुसो ब्रदर्स यांचा हा चित्रपट मार्क ग्रेनी यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे. हा एक क्राईम थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. ज्यात रेयान गोसलिंग, ख्रिस इवान्स, एना डी अरमान, रेगे जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.