'द काश्मिर फाईल्स'नं(The Kashmir Files) भल्याभल्यांना बॉक्सऑफिस(Box office)वर दम तोडायला लावला याची जोरदार चर्चा सुरु आहे. लो बजेट सिनेमा असलेल्या काश्मिर फाईल्सनं प्रदर्शनानंतर पहिला आठवडा संपता संपता 100 करोडपर्यंत मजल मारली होती. आता दुसऱ्या आठवड्यात सिनेमानं 180 करोडची कमाई केलीय. तर सिने विश्लेषकांच्या मते 'द काश्मिर फाईल्स' 200 करोडही कमावेल असं बोललं जात आहे. या सिनेमानं कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर बॉलीवूड-हॉलीवूडमधील जेवढे सिनेमे प्रदर्शित झाले त्यांमध्ये कमी वेळात जलद गतीनं कमाई केल्याचं बोललं जात आहे. 'स्पायडर-मॅन-नो वे होम','सूर्यवंशी' आणि '83' चा बॉक्सऑफिस कमाईचा रेकॉर्ड 'द काश्मिर फाईल्स'नं तोडला अशीही बातमी आहे.
सिने ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी सिनेमाच्या बिझनेस संदर्भात स्पष्टिकरण देणारे काही आकडे दिले आहेत. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे,''कोरोनानंतर बॉक्सऑफिस पुन्हा 'द काश्मिर फाईल्स'नं दणाणून सोडलं आहे. 'सूर्यवंशी', '83' या बॉलीवूडच्या तर 'स्पायडर-मॅन' या हॉलीवूडच्या सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यातही 'द काश्मिर फाईल्स' बाजी मारुन गेला आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 'स्पायडर मॅन'-नो वे होम' या हॉलीवूडच्या सिनेमाने भारतात रग्गड कमाई केली. सर्व रेकॉर्डही आपल्या नावावर करवून घेतले होते. पण आता त्याला द काश्मिर फाईल्सनं मागे टाकलं आहे.''
'द काश्मिर फाईल्स' सिनेमानं अक्षयच्या नवीन प्रदर्शित झालेल्या 'बच्चन पांडे' सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनलाही धक्का लावलाय असं म्हटलं जात आहे. 'बच्चन पांडे' सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात ३७ करोडचा बिझनेस केला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात अनुपम खेर,दर्शन कुमार,पल्लवी जोशी,पुनीत इस्सर,मृणाल कुलकर्णी असे अनेक कलाकार आहेत. १९९० मध्ये काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत झालेला नरसंहार आणि पलायनवाद या सत्य घटनेवर आधारित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा आधारित आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी ते अगदी दिग्गज राजकारण्यांपर्यंत अनेकांनी सिनेमाची प्रशंसा केली आहे. सिनेमा प्रशंसेमुळे जितका चर्चेत राहिला तितकाच वादांमुळेही त्याची चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.