'वरुणविषयी हे सांगायचं नव्हतं पण...' विवेक अग्निहोत्रींचा मोठा खुलासा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा अनेक वादांनी चर्चेत राहिला आहे.
VIvek Agnihotri, Varun Dhawan
VIvek Agnihotri, Varun DhawanGoogle
Updated on

'द काश्मिर फाईल्स' सिनेमा प्रदर्शिनाआधीपासून ते प्रदर्शनानंतरही अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. अनेक स्तरातून हा सिनेमा जितका कौतूकास पात्र ठरला आहे,तितकाच विरोधकांच्या टीकेचाही या सिनेमानं सामना केला आहे. राजकीय गोटात या सिनेमामुळे चक्क दोन गट पडलेले पहायला मिळाले. बॉलीवूडमधनंही सिनेमाविषयी उशिरा बोलायला सुरुवात केली गेली असली तरी काहींनी सिनेमाविषयी चांगली मतं नोंदवली आहेत तर काहींनी सिनेमाला नावंही ठेवली आहेत. 'प्रोपोगेंडा' हा शब्द सिनेमाविषयी बॉलीवूडमधनं जास्त बोलला गेला आहे. असो, आता चक्क बातमी कानावर येतेय की विवेक अग्निहोत्री यांनी वरुण धवन विषयी मोठं भाष्य केल्याची. वरुण विषयी बोलताना विवेक अग्निहोत्री यांचे डोळे पाणावले होते असं का म्हटलं जातंय. चला,जाणून घेऊया सविस्तर.

VIvek Agnihotri, Varun Dhawan
पुण्यात कॉन्सर्टसाठी गेलेल्या सबाला हृतिक करतोय 'Miss';म्हणाला'...'

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी वरुण धवनविषयी एक खुलासा केला आहे. ते म्हणाले,''मला हे सांगायचं नव्हतं. पण मला ते सांगायची गरज आता वाटत आहे. वरुणनं मला तेव्हा मदत केलीय जेव्हा या जगात कुणीच माझ्या पाठी मदतीसाठी उभं नव्हतं. तो खुप चांगल्या मनाचा आहे. एक अभिनेता म्हणून तो जितका गुणी आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक एक व्यक्ति म्हणून तो सद्गुणी आहे. मला नेहमी त्याच्याबद्दल वाटतं की त्यानं कायम सुखी असावं आणि यशस्वी देखील व्हावं. मला त्याच्यासोबत सिनेमा करायचा आहे. त्यामुळे त्यानं मला आर्थिक सहकार्य केलं हे सांगायचं नव्हतं. तो मला मदत करेल अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. वरुणविषयी हे सांगाताना विवेक अग्निहोत्री खूप भावनिक झाले होते ''.

VIvek Agnihotri, Varun Dhawan
बाळासाहेबांविषयी एका काश्मिरी पंडिताने काय सांगितले चिन्मय मांडलेकरला?

काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांच्या सिनेमासाठी वरुणनं सोशल मीडियावर थम्ब आयकॉन पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं सिनेमातील कलाकारांचं आणि कलाकृतीचं तोंडभरुन कौतूक आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलं होतं. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी,मिथुल चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी असे कलाकार काम करताना दिसत आहेत. १९९० सालात काश्मिर खोऱ्यात काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या नरसंहार आणि पलायनवादावर आधारित हा सिनेमा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.