गोव्याचे माजी मुख्यमंत्री(Goa Former Chief Minister) आणि भारतीय जनता पक्षाचे नेते(BJP Leader) प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा पाहिल्यानंतर एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गोव्यात 'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा टॅक्स फ्री घोषित केला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील आपल्या राज्यात 'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा याआधीच टॅक्स फ्री म्हणून घोषित केला होता. हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील 'द काश्मिर फाईल्स' आपापल्या राज्यात टॅक्स फ्री केला आहे. हरयाणा सरकारनं तर मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटर्सना हा सिनेमा दाखवण्यासाठी स्टेट जीएसटी लागू न करण्याचे आदेश दिले आहेत.
'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चत होता. १९९० साली काश्मिर मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारं कथानक या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. त्यावेळचा नरसंहार सिनेमात दाखवल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. पण त्याला न जुमानता सिनेमा प्रदर्शित झाला अन् आता सर्वत्र सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सिेनमा पाहून आल्यानंतर लोकं अक्षरशः भावूक होताना दिसत आहेत. १९९० सालात काश्मिरी पंडितांसोबतचा अन्याय आणि तेव्हाचं खरं सत्य या सिनेमातनं दाखवण्यात आलं आहे. सर्वसामान्यच नाहीत तर आता राजकीय़ नेते ही सिनेमा पाहतायत आणि चांगल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. गोव्यामध्ये देखील प्रमोद सावंत यांनी सिनेमा पाहिल्यानंतर लगेच सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.