The Kerala Story सिनेमा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या सिनेमानं रिलीज आधीपासून देशभरात गोंधळ घातला होता आणि त्याचे पडसाद जगभरात उमटलेले आपण पाहिले. अर्थात केरळमधून ३२ हजार मुलींचं अचानक गायब होणं.. त्यामागचं धक्कातंत्र आणि त्याला असलेली दहशतवादाची पार्श्वभूमी एवढं सगळं सिनेमातून मांडल्यावर आणखी काय घडणार होतं.
पण एवढं सगळं सिनेमाच्या बाबतीत नकारात्मक घडूनही 'द केरळ स्टोरी' सिनेमानं बॉक्सऑफिसवर तगडी कमाई केली. २०-२५ करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं २०० करोडचा टप्पा गाठला यातच सिनेमाचं मोठं यश आलं.
'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या बाबतीत आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी एका मुलाखतीत द केरळ स्टोरी सिनेमाचा सीक्वेल येणार असल्याची मोठी हिंट दिली आहे.
विपुल शाह म्हणाले आहेत,''या सिनेमाची कथा अजून संपलेली नाही..अजून बरंच काही सांगायचं आहे. यावेळी आम्ही ते नक्कीच समोर आणायचा प्रयत्न करू. तुम्ही काळजी करू नका''. (The Kerala Story 2 update producer vipul amrutlala shah reaction on film sequel)
विपुल अमृतलाल शाह यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता सर्वत्र 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे,ज्या केरळमधील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी असतात.
त्यांना त्यांच्याच ग्रुपमधील चौथी एक मुलगी जिनं मैत्रीचा मुखवटा तोंडावर चढवलेला असतो ती फसवते. आणि आयएसआयएसमध्ये फसवून सामिल करते. त्या तिघींपैकी दोघींना फसवून ईस्लाम कबूल करण्यास मजबूर केलं जातं. तिसरीवर नकार देते म्हणून शारिरीक अत्याचार केले जातात.
पुढे जाऊन एकीला दहशतवादी संघटनेत सामिल करुन घेतलं जात तिच्याही नकळत..यातनं ती संघर्ष करत स्वतःला वाचवते पण पुढे सीरियाच्या पोलिस स्टेशनमध्ये ती सुरक्षित आहे आणि सध्या शिक्षा भोगत आहे असं दाखवण्यात आलं आहे. तिचं पुढे काय झालं..किंवा हा लढा सध्या काय स्वरुपात लढला जातोय..अजूनही हे सगळं सुरूच आहे की यावर सरकारनं कारवाईचा बडगा उगारला आहे..हे सगळे मुद्दे दुसऱ्या भागात दाखवले जातील असं देखील बोललं जात आहे.
असा हा सगळा जर-तरचा भाग आहे सध्या..पण यावरनं देखील तुंबळ युद्ध रंगणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे 'द केरळ स्टोरी'च्या दुसऱ्या भागाला विरोध होणार हे ठरलेलं.
द केरळ स्टोरी आधी भारतात रिलीज झाला. केरळ,तामिळनाडू,पश्चिम बंगाल सारख्या राज्यांनी सिनेमाला कडाडून विरोध केल्याचं आपण पाहिलं. तर मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,उत्तराखंड,हरियाणामध्ये सिनेमा टॅक्स फ्री केला गेला होता.
परदेशात काही ठिकाणी सिनेमाला आधी विरोध केला गेला पण त्याला न जुमानता सिनेमाचं स्क्रीनिंग केलं गेलं ज्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. तर अदा शर्मा,योगिता बिहानी, सोनिया बलानी,सिद्धी इदनानी यांनी सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.