The Kerala Story: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' सध्या थिएटरमध्ये जोरदार प्रदर्शन करताना दिसत आहे. सिनेमाला रिलीज होऊन १० दिवस झाले आहेत आणि बॉक्सऑफिसवर सिनेमा जोरदार कमाई करत आहे. आता सिनेमाचा अभिनेता विजय कृष्णानं 'द केरळ स्टोरी' विषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
द केरळ स्टोरीमध्ये विजय कृष्णानं अदा शर्माच्या नवऱ्याचा म्हणजे इशराक ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमा आणि त्यातील भूमिकेविषयी अभिनेत्यानं खूप इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर केल्या आहेत. जे लोक सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचा राग राग करत होते तेच त्याची आता प्रशंसा करतायत असं देखील तो म्हणाला.(The Kerala Story actor Vijay Krishna Says who hated him for film now complimenting him)
विजय कृष्णने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची बिनधास्त उत्तरं दिली. संवादा दरम्यान त्यानं आपली व्यक्तिरेखा इशराक विषयी बोलताना सांगितलं की,''मी खलनायक इशराक हे पात्र सिनेमात रंगवलं आहे. तो आपल्या वयाच्याच काही तरुणांसोबत चुकीच्या मार्गावर भरकटला आहे''.
विजय कृष्णा पुढे म्हणाला, ''इशराक मुळतः एक ख्रिश्चन असतो, जो नंतर ईस्लाम धर्माचा स्विकार करतो. जेव्हा तो ISIS जॉइन करतो तेव्हा त्याला एक उद्दिष्ट्य मिळतं. त्याला वाटतं की सगळं त्याला जसं हवंय तसंच सुरू राहिलं पाहिजे, मग त्यासाठी भले तो आपल्या नैतिक मूल्यांचा त्याग करत असेल तरीही''.
विजय कृष्णनं द केरळ स्टोरी सिनेमावरनं रंगलेल्या वादावरही भाष्य केलं. तो म्हणाला,''सिनेमाविषयी होणारी प्रशंसा,कमेंट्स आणि रिव्ह्यू मला सोशल मीडियावर वैयक्तिकरित्या मिळत आहे. सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे की लोक सिनेमा पाहून माझा राग राग करत होते.पण माझं सोशल मीडिया प्रोफाईल पाहून लोक माझी प्रशंसा करत आहेत''.
कोणी म्हटलंय की,''सिनेमा पाहून आम्हाला तुझी खूप चिड आली होती पण तुझं प्रोफाईल पाहिलं आणि वाटतंय की तू देव माणूस आहेस''.
विजय पुढे म्हणाला,''हे खूपच मजेदार वाटतं मला की माझ्या ज्या भूमिकेचा लोक राग करत होते तेच आता माझी प्रशंसा करतायत. हे तर चांगलं आहे की लोक रियल आणि रील मधला फरक समजतात,खासकरून आजच्या तारखेला सोशल मीडिया असल्यामुळे हे जमून आलं. कारण आधी लोक पडद्यावर जे पहायचे तेच खरं समजायचे. अभिनेता व्हिलन असेल तर खऱ्या आयुष्यातही तो वाईट आहे असंच त्यांना वाटायचं''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.