Adah Sharma Marathi Poem: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ आणि फोटो शेयर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही बरिच आहे.
तिचे व्हिडिओ हे चाहत्यांना खुप आवडत असतात. द केरळ स्टोरी हा सिनेमा तिच्यासाठी खुपच लकी ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला त्याचबरोबर अदाच्या लाकप्रियतेत बरिच वाढही केली.
तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना वेड केलं. हिंदी, इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या अदाला मराठी भाषादेखील तशीच अगदी उत्तमरित्या बोलता येते हे तर तिच्या चाहत्यांना माहितचं असेल.
अदाने काही महिन्यांपूर्वी मराठी बोलतांनाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले होते. 'एक होती इडली, ती होती चिडली', 'अटक मटक चवळी चटक' अशा काही छोट्या कविता ती तिच्या चाहत्यांना बोलून दाखवते. तिच्या या व्हिडिओची डिमांड इतकी वाढली की आता अदानं पुन्हा एकदा एक मराठी कविता प्रेक्षकांना ऐकवली आहे.
तिचे हे व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चाहते अजूनही तिच्या मराठीचं कौतुक करत आहेत. पुर्वी शाळेत शिकवली जाणारी एक कविता अदानं चाहत्यांना ऐकवली आहे. तिने जाड्या अन् रड्या ची कविता अतिशय मस्त शैलीत प्रेक्षकांना ऐकवली.
सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अदा इतकी छान मराठी बोलते यावर काहींचा विश्वास बसत नाही. काहींना तिला मराठी सिनेमातही पहायचे आहे. चाहते तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी अदाचं कौतुक केलं आहे.
अदाची गेल्या काही दिवसांपुर्वी तब्येत बिघडली होती. काही दिवसांपुर्वीच तिला अचानक तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आणि डायरियाची समस्या होती.
तिला पित्ताची समस्या उद्धभवल्यामुळे तिला अस्वस्थ वाटतं होतं. त्यांमुळे तिने आता काही दिवस कामातुन ब्रेक घेणार असल्याचं सागितलं आहे.
अदा ही लवकरच कमांडो या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तो 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.