सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती चित्रपट निर्माते सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' ची. हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादात सापडला आणि आता प्रदर्शितही झाला तरी या चित्रपटावरील वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही आहे.
काहींना हा चित्रपट खुपच प्रभावी वाटला त काहींना हा चित्रपट प्रोपगंडा वाटत आहे. आता समिश्र प्रतिक्रिया असतांना या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही बरचं काही सांगून जात आहे.
(The Kerala Story Actress Adah Sharma Responds To Those Who Call The Kerala Story Is A Propaganda)
'द केरळ स्टोरी' या चित्रपटात कशा प्रकारे इतर धर्मिय महिलांचा ब्रेन वॉश करुन त्यांना इस्लामचा स्वीकार करण्यास भाग पाडले जाते आणि त्यानंतर इराक आणि सीरियामध्ये जाऊन ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करण्यात येत असं काहीशी कहानी दाखवण्यात आली आहे.
केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियात नेऊन ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. या प्रकरणाने प्रचंड वादाचे स्वरूप धारण केले असून त्याला अपप्रचार म्हटले जात आहे. आता याच मुद्यावर चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेली अभिनेत्री अदा शर्माने हिने प्रत्युत्तर दिले आहे. ज्याची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.
अदानं या चित्रपटानिमित्त ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली यात तिने चित्रपटातील तिचा एक फोटो शेअर केला आणि चित्रपटाला अपप्रचार (प्रोपगंडा )म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अदा शर्माने ट्विट करून लिहिले, 'आणि काही लोक अजूनही 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत. अनेक भारतीय चित्रपटांचे प्रशस्तिपत्रक पाहून ते म्हणत आहे की अशा घटना अजिबात घडल्याच नाहीत. 'माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की Google वर ISIS आणि Brides हे दोन शब्द टाईप करा, कदाचित गोर्या मुलींचे अकाउंट असतिल जे तुम्हाला सांगू शकतील की आमच्या भारतीय चित्रपटाची कथा खरी आहे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.