The Kerala Story Box Office: निव्वळ 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला द केरळ स्टोरी बॉक्स ऑफिसवर छापतोय नोटा..

The Kerala Story BO Day 16:
The Kerala Story BO Day 16: Esakal
Updated on

The Kerala Story BO Day 16: केरळ स्टोरी' रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला . या चित्रपटाची कथा केरळमधील मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या मुलींभोवती फिरते.

या चित्रपटातून दहशतवादाविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटामुळे अनेक वाद सुरु झाले. एका वर्गाला वाटत की हा प्रोपगंडा चित्रपट आहे. त्यामुळे यावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. तर काही राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

The Kerala Story BO Day 16:
Adipurush Jai Shri Ram Song: अजय-अतुलचा नादच खुळा! आदिपुरुषच्या 'जय श्री राम' गाण्यानं रिलिज होताच केला रेकॉर्ड...

या चित्रपटाला रिलिज होवुन आता 16 दिवस झाले असले तरी हा चित्रपट अजुनही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.


अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या कमाईचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी होत होता पण तिसऱ्या शनिवारी म्हणजेच रिलीजच्या 16व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वेग पकडला.

The Kerala Story BO Day 16:
बालकलाकार Saisha Bhoir च्या आईला पोलिसांनी घेतलं ताब्यात, फसवणुकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण

यासह तिसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्याच वेळी, 'द केरळ स्टोरी'च्या 16व्या दिवसाच्या कमाईचे सरासरी आकडेही आले आहेत.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'The Kerala Story' ने तिसऱ्या शनिवारी म्हणजेच रिलीजच्या 16 व्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 187.32 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

त्याचवेळी, सुमारे 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा जादुई आकडा पार करेल, अशी आशाही निर्मात्यांना आहे.

The Kerala Story BO Day 16:
Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मध्ये मानसी नाईक - अमृता खानविलकरचा सन्मान, पहा विजेत्यांची यादी

द केरळ स्टोरी 250 कोटींचा आकडा सहज गाठेल असे म्हणता येईल. त्यातच लवकरच द केरळ स्टोरी हा वर्षातील दुसरा सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट बनेल.


 'द केरळ स्टोरी'  याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.