आता वाटचाल 300 कोटींकडे! 'The Kerala Story' नं पुन्हा रचला विक्रम; कमाईनं घेतली झेप...

the kerala story box office collection
the kerala story box office collection esakal
Updated on

The kerala story box office collection: 'द केरळ स्टोरी' या विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

5 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही याची बरिच चर्चा रंगली.

केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता महिना होईल तरी देखील या चित्रपटाच्या कमाईचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावतच आहे.

the kerala story box office collection
Uorfi Javed On Wrestler Protest: 'तुमचा खोटेपणा सिद्ध..', अजब फॅशनने सर्वांना चकित करणारी उर्फी कुस्तीपटूंसाठी उतरली थेट मैदानात..

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने अखेर २४व्या दिवशी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. काही दिवसांपुर्वीच हा वादग्रस्त चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

the kerala story box office collection
Akanksha Dubeyच्या मृत्यूला नवं वळण! कपड्याच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर, आरोपींची डीएनए चाचणी होणार..

आता चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत त्याने 10.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

भारतात या चित्रपटाची आतापर्यंत 224.72 कोटींची कमाई झाली आहे, तर जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत 278.20 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि ज्या वेगाने चित्रपटाची प्रगती होत आहे, त्यादृष्टीने चित्रपटाला यश मिळत आहे त्यामुळे लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा करणं चुकीचे ठरणार नाही.

बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी' समोर हॉलिवूड चित्रपट Fast X , विद्युत जामवालच्या IB-71, नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'जोगिरा सारा रा रा' हा चित्रपटही द केरळ स्टोरीपुढे फेल गेला.

the kerala story box office collection
Arjun Kapoor: ..यातच प्रगती आहे! स्वतःच्याच न्यूड फोटो बाबत जरा स्पष्टच बोलला अर्जुन कपूर..

केरळमधील 32,000 हिंदू महिलांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या संशयास्पद दाव्यामुळे चित्रपटाची कथा वादात अडकली होती. पण तरीही ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत आणि चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे.

अदा शर्मा बरोबरच 'द केरळ स्टोरी' मध्ये योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी, विजय कृष्णा, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.